Friday, October 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पाचगणी घाटातील अपघातात मृत्युमुखी पडलेल्या लोणी काळभोर येथील दोन तरुणांवर अंत्यसंस्कार

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 14 March 2025, 12:23

लोणी काळभोर : वाई-पाचगणी रस्त्यावर झालेल्या अपघातात लोणी काळभोर (ता. हवेली) येथील अक्षय म्हस्कू काळभोर (वय-26) व सौरभ जालिंदर काळभोर (वय-26) या दोन मित्रांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या पार्थिवावर लोणी काळभोर येथील स्मशानभूमीत आज (ता.14 )सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राजकीय, सामाजिक व उद्योजक क्षेत्रातील नागरिकांनी मोठया संख्येने हजेरी लावली होती.

दरम्यान, अक्षय काळभोर व सौरभ काळभोर यांच्या निधनाने लोणी काळभोर गावावर शोककळा पसरली आहे. सौरभच्या पश्चात आई, वडील, पत्नी व नवजात मुलगी असा परिवार आहे. तर अक्षयच्या पश्चात आई, वडील, भाऊ व पत्नी असा परिवार आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, लोणी काळभोर येथील अक्षय काळभोर, सौरभ काळभोर, वैभव  काळभोर व बजरंग काळभोर हे चौघेजण मित्र आहेत. ते दोन दिवसांपूर्वी त्यांच्या पांढऱ्या रंगाच्या कारने ( क्र. एमएच १२ क्यूटी ७७११) कोकणात फिरायला गेले होते. होळीचा सण घरी साजरा करण्यासाठी गुरुवारी (ता. 13 )सर्वजण परतीच्या प्रवासाला निघाले होते. महाबळेश्वर – पाचगणी मार्गे पुण्याला जात असताना, पसरणी घाटातील बुवासाहेब मंदिराजवळ शंभर मीटर अंतरावर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यानंतर घाट उताराचा अंदाज न आल्याने त्यांची गाडी थेट दोनशे फूट खोल दरीत पाच वाजण्याच्या सुमारास कोसळली.

या अपघाताची माहिती मिळताच, पोलीस उपअधीक्षक बाळकृष्ण भालचीम, पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे व सिद्धनाथवाडी येथील शिवसह्याद्री रेस्क्यू टीमच्या कार्यकर्त्यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेऊन जखमींना दोराच्या साह्याने खोल दरीतून बाहेर काढले. यावेळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. अनेक वाहने रस्त्यावरच उभी राहिल्याने घाटात दोन्ही बाजूस वाहनाच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या.

 

चारही जखमींना वाई येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र त्यातील अक्षय काळभोर व सौरभ काळभोर यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे तेथील डॉक्टरांनी घोषित केले. तर वैभव काळभोर व बजरंग काळभोर हे दोघेजण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर वाई (सातारा) येथील बेलर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या अपघातामुळे लोणी काळभोर गावावर व काळभोर कुटुंबावर दुख:चा डोंगर कोसळला आहे. लोणी काळभोर व कदमवाकवस्ती गाव आज बंद ठेवण्यात आली आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

आकाश ठोसर-रिंकू राजगुरूंच्या नात्याची चर्चा रंगली? अखेर ‘परश्याने’च सांगितलं खरं काय

Friday, 2 October 2026, 14:06

बनावट परवानग्या दाखवून इमारत उभारली? फ्लॅटही विकले; जमीनमालक, शासन अन् वित्तीय संस्थांची फसवणूक; लोहगावातील प्रकार

Friday, 2 October 2026, 13:53

सियाला अंधारात ठेवून चेतन चौधरीचे दुसऱ्या तरुणींसोबत संबंध? दारू, लॉज अन् तरुणींचे जबाब; चेतनबाबत धक्कादायक खुलासा

Friday, 2 October 2026, 13:38

पिकांना पाणी देण्याची धडपड; शेटफळगढेत कॅनलच्या पाण्यावरून शेतकरी-कंत्राटी कर्मचाऱ्यांत जोरदार वाद

Friday, 2 October 2026, 12:48

केक-कटिंगऐवजी आरोग्य शिबिर! माऊली आबांच्या वाढदिवशी 1600 हून अधिक नागरिकांची तपासणी

Friday, 2 October 2026, 12:37

Snapchat वर अनोळखी मेसेज, मग अश्लील फोटो अन् 19 वर्षीय तरुणीला थेट धमकी! शिरूर पोलिसांत अनोळखी इसमाविरुद्ध गुन्हा दाखल

Friday, 2 October 2026, 12:27
Next Post

नैसर्गिक रंगांचा वापर करण्याचे आवाहन ; क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp