पुणे : दर महिन्याच्या सुरुवातीला सरकार नवनवीन बदल करत असते. दोन दिवसानंतर डिसेंबर महिना सुरु होणार आहे. त्यामुळे डिसेंबरपासून अनेक महत्त्वाचे बदल होणार आहेत, ज्याचा थेट परिणाम तुमच्या दैनंदिन जीवनावर होणार आहे.
१) घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरची किंमत कमी होऊ शकते?
डिसेंबरमध्ये घरगुती स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरच्या किमती कमी होऊ शकतात. ऑक्टोबर महिन्याच्या आकडेवारीवरून किरकोळ महागाई दरात नरमाई येण्याची चिन्हे आहेत. यानंतर सीएनजी आणि पीएनजीच्या किमतीतही कपात जाहीर होण्याची शक्यता आहे.
२) जीवन प्रमाणपत्र न दिल्यास पेन्शनधारकांनी पेन्शन बंद
जीवन प्रमाणपत्र न दिल्यास पेन्शनधारकांनी पेन्शन बंद करण्यात येणार आहे. जीवन प्रमाणपत्र म्हणजेच जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची अंतिम तारीख ३० नोव्हेंबर २०२२ आहे. अशा परिस्थितीत, त्यांनी या महिन्याच्या अखेरीस त्यांचे जीवन प्रमाणपत्र सादर केले नाही, तर १ डिसेंबरपासून ते करताना त्यांची गैरसोय होऊ शकते. जर जीवन प्रमाणपत्र वेळेवर सादर केले नाही तर त्यांचे पेन्शन देखील थांबू शकते.
३) डिसेंबर महिन्यात १३ दिवस बँका बंद
डिसेंबर महिन्यात एकूण १३ दिवस बँका बंद राहणार आहेत. या सुट्यांमध्ये दुसरा आणि चौथा शनिवार आणि रविवार यांचा समावेश आहे. या महिन्यात ख्रिसमस, वर्षाचा शेवटचा दिवस (३१ डिसेंबर) आणि गुरु गोविंद सिंग जी यांची जयंती देखील आहे. यामुळे बँका बंद राहणार आहेत.
४) एटीएममधून पैसे काढणे
एटीएममधून पैसे काढणे अधिक सुरक्षित व सोप्पे होईल. कारण एटीएममधून पैसे काढताना अनेकांची फसवणूक होण्याची शक्यता असते. अशा वेळी पंजाब नॅशनल बँक एटीएममधून पैसे काढण्याच्या प्रक्रियेत बदल करणार आहे. आता तुम्ही एटीएममध्ये कार्ड टाकताच तुमच्या मोबाइल नंबरवर एक ओटीपी येईल. हा ओटीपी एटीएम स्क्रीनवर दिलेल्या कॉलममध्ये टाकावा लागेल, त्यानंतरच तुम्ही पैसे काढू शकाल.
५) ट्रेनच्या वेळापत्रकात बदल होण्याची शक्यता?
डिसेंबरमध्ये, देशाच्या बहुतेक भागांमध्ये हिवाळ्यासह धुके वाढू लागते. त्यामुळे गाड्यांच्या वाहतुकीत अडचण निर्माण होते. हे पाहता रेल्वेनेही वेळापत्रकात बदल करण्याची तयारी केली आहे. डिसेंबर महिन्यात, रेल्वे बोर्ड वेळापत्रकात सुधारणा करेल आणि नवीन वेळापत्रकानुसार गाड्या चालवल्या जातील. तथापि, कोणत्या गाड्यांचे वेळापत्रक बदलण्याच्या अधीन आहे. ते १ डिसेंबर रोजीच निश्चित केले जाईल.