पुणे : गोदामाचे कुलूप तोडून चोरट्यांनी टेप्स फिटींग, बाथरूम बांधणीसाठी आवश्यक साहित्य, सॅनिटरी वेअर असा ३ लाख ७१ हजारांचे साहित्य चोरून नेले. २३ ते २४ डिसेंबर कालावधीत आंबेगावमधील रंगोली बाथ डिस्टुबिटर्स गोदामात ही घटना घडली आहे. याप्रकरणी आंबेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आंबेगाव येथील रंगोली बाथ डिस्टुबिटर्स गोदामाचे कुलूप तोडून चोरट्यांनी आतमध्ये प्रवेश केला. गोदामातील बाथरूम बांधणीचे साहित्य, सॅनिटरी वेअर असा ३ लाख ७१ हजारांचे साहित्य चोरून नेले. याप्रकरणी दुसऱ्या दिवशी तक्रारदारांना गोदामात चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यानुसार त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.