बीड : परभणी येथील मोर्चादरम्यान केलेल्या भाषणात मंत्री धनंजय मुंडे यांच्याबद्दल बदनामी होईल असे वक्तव्य करून धमकी दिल्याप्रकरणी येथील शहर पोलीस ठाण्यात मराठा क्रांती मोर्चाचे नेते मनोज जरांग-पाटील यांच्याविरुद्ध मागील २४ तासांत बीड जिल्ह्यातील परळी, अंबाजोगाई, धारूर आणि बीड येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे.
परभणी येथे शनिवार, ४ जानेवारी रोजी दुपारी मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चात झालेल्या भाषणात मनोज जरांगे-पाटील यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्याबद्दल बदनामी होईल असे वक्तव्य करून धमकी दिली व त्या भाषणाचा व्हिडीओ व्हायरल केला. याप्रकरणी गेल्या २४ तासांत जिल्ह्यातील अनुक्रमे परळी शहर, बीड येथील शिवाजीनगर, अंबाजोगाई शहर आणि धारूर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत.