आळंदी : पुणे शहर आणि जिल्ह्यात बेकायदा वेश्याव्यवसायाची अनेक प्रकरणे समोर येत आहेत. लॉजवर बेकायदेशीररित्या वेश्याव्यवसाय चालवल्याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई सोमवारी (ता. ११) आळंदी, मरकळ येथे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष गुन्हे शाखा यांनी केली.
या प्रकरणी दिनेश नागेश्वर यादव (वय ४२, रा. आळंदी) व मॅनेजर विजय शिवचरण यादव (वय ३०, रा. बिहार) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
या प्रकरणी पोलिस हवालदार मारुती करचुंडे यांनी आळंदी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे बेकायदेशीररित्या पिडीतेकडून त्यांच्या उपजिविकेसाठी वेश्याव्यवसाय करून घेत होते. याची माहिती मिळताच पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे.