महाराष्ट्र: महाराष्ट्रात आयपीएस आणि आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सुरूच असल्याचे समोर आले आहे. सात वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. गेल्या आठवड्यात पाच आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्यानंतर पुन्हा काही आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकारने 1 एप्रिल 2025 रोजी बदल्यांचे आदेश दिले होते. राज्यात महायुतीचे सरकार स्थापन होऊन 4 महिन्यांहून अधिक कालावधी होऊन गेला आहे, काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 6 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. राज्यात गेल्या काही दिवसांपासून वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा सिलसिला सुरूच आहे. आता पुन्हा 7 अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

येथे पाहा, कोणाच्या बदल्या झाल्या
– राजेंद्र भारुड : अतिरिक्त विकास आयुक्त, उद्योग

– निधी पांडे: व्यवस्थापकीय संचालक, लघु उद्योग
– इंदुरानी जाखरे : जिल्हाधिकारी, पालघर
– नीना भोसले : मुख्य कार्यकारी अधिकारी, रायगड जिल्हा परिषद
– वैष्णवी ब: अतिरिक्त आयुक्त, नागपूर महानगरपालिका
– भारत बस्तेवाड : रोजगार हमी योजना, नागपूर
– लक्ष्मी नारायण मिश्रा: सह व्यवस्थापकीय संचालक, एमएसआरडीसी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारनं मंगळवारी पुन्हा एकदा सात आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. यामध्ये भारत बास्टेवाड, लक्ष्मी नारायण मिश्रा, निधी पांडेसह आणखी 4 जणांची बदली करण्यात आली आहे.
दरम्यान, गेल्याच आठवड्यात राज्यातील आणखी कोणत्या अधिकाऱ्यांचे बदलीचे आदेश देण्यात आले आहेत. ते हि पाहूया..
-बी.एच. पालवे- व्यवस्थापकीय संचालक, मुंबई
– मनोज रानडे- मुख्य कार्यकारी अधिकारी, पालघर
-शुभम गुप्ता- विदर्भ वैधानिक विकास मंडळ येथे सदस्य सचिव, नागपूर
-अंजली रमेश-मुख्य कार्यकारी अधिकारी, हिंगोली
-झेनिथ चंद्र देवंथुला -प्रकल्प अधिकारी, ITDP, किनवट आणि सहाय्यक जिल्हाधिकारी, किनवट उपविभाग,नांदेड







