लहू चव्हाण
काटवली : विधवांना समाजात सन्मानाने वागणूक मिळावी. या उद्देशाने यावर्षी ध्वजारोहण विधवा महिलांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती काटवलीच्या ग्रामसेविका अश्विनी कदम यांनी दिली आहे.
काटवली गावाची ग्रामसभा आज झाली. या सभेत विधवा प्रथा बंदीचा ठराव घेण्यात आला. तसेच ध्वजारोहण विधवा महिलांच्या हस्ते करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावेळी हर घर तिरंगा योजनेअंतर्गत ग्रामस्थांना ध्वज वाटप करण्यात आले. तर या वर्षी स्वराज्य उपक्रमांतर्गत तीन दिवस ध्वजारोहण होणार असून या निमित्ताने दोन दिवस विधवा महिलांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे. तर या सभेत ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते विधवा महिलांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना विस्तार अधिकारी तथा ग्रामपंचायतीचे प्रशासक ऐस. बी. निकम म्म्हणले कि, सर्वांनी या ध्वजाचा अवमान न होता घरोघरी ध्वजारोहण करायचे आहे. याबाबत सर्वांनी जागरूक राहून या कामी करावी. तसेच महिलांना जुन्या रुढी ,परंपरा यांना फाटा देवून या महिलांना समाजात सन्मानाची वागणूक मिळवून देण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील रहावे. असे निकम यावेळी आवाहन केले.
दरम्यान, विधवा महिलांच्या हस्ते ध्वजारोहण करण्याचा निर्णय घेणारी काटवली ही ग्रामपंचायत पहिली ग्रामपंचायत असून महिला आणि ग्रामस्थांनी घेतलेला हा अनोखा आणि धाडसी निर्णय सर्वानाच प्रेरणादायी आणि या महिलांना जगण्याचे आणखी सकारात्मक बळ देणारा आहे.
यावेळी राजेंद्र बेलोशे, मानसिंग बेलोशे, तुकाराम बेलोशे, संदीप बेलोशे, राम शिंदे, सर्जेराव कदम, सुरेश गोळे,सदाशिव बेलोशे, बबनराव बेलोशे , संतोष कळंबे, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री. महामुनी, संगीता सुतार, प्रेरिका सुनीता बेलोशे, राणी गोळे व ग्रामस्थ या सभेला उपस्थित होते.