मुंबई : शेअर मार्केटमध्ये सातत्याने चढउतार पाहिला मिळत आहे. त्यात टाटा ग्रुपच्या एका कंपनीच्या स्टॉकमध्ये पहिल्यांदा 90 टक्क्यांची घसरण झाली होती. मात्र, नंतर या कंपनीच्या नफ्यात तब्बल 4500 टक्के वाढ झाल्याचे समोर आले आहे.
Tata Group ची कंपनी Tejas Networks ला इतका चांगला फायदा झाला आहे. कंपनीने नफा आणि इतर बाबींच्या बाबतीत सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. एकेकाळी तोट्यात असलेली ही कंपनी टाटा समूहात सामील झाल्यापासून प्रचंड नफा कमवत आहे. तेजस नेटवर्क्सने चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत 610% वाढीसह 2811.26 कोटी रुपयांची कमाई केली आहे, गेल्या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत ती 395.95 कोटी रुपये होती.
कंपनीचा खर्च 453.47 टक्क्यांनी वाढून 2350.35 कोटी रुपये झाला आहे, जो गेल्या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत 424.66 कोटी रुपये होता. कंपनीच्या ऑपरेटिंग उत्पन्नातही जबरदस्त नफा झाला आहे, जो 1705.4% ने वाढून 460.91 कोटी रुपये झाला आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत ते 28.71 कोटी होते.
तसेच कंपनीच्या निव्वळ उत्पन्नातही वाढ झाली आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीचे निव्वळ उत्पन्न उणे 12.64 कोटी रुपये होते, जे आता 2277.06 टक्क्यांनी वाढून 275.18 कोटी रुपये झाले आहे. त्याच वेळी, करपूर्व निव्वळ उत्पन्नात 2414.04% वाढ झाली आहे, जी मागील वर्षीच्या याच तिमाहीत उणे 17.74 कोटी रुपये होती.