पुणे : वारजे परिसरातील एका मंडप साहित्याच्या गोदमाला बुधवारी (दि. १८) लागलेली आग आटोक्यात आणताना अग्निशमन दलाचा जवान किरकोळ जखमी झाला. कात्रज भागातील एका प्लायवूडच्या गोदामास लागलेल्या आगीत तेथील साहित्य जळून खाक झाले.
वारजेमधील दांगट पाटीलनगर परिसरात असलेल्या मंडप साहित्याच्या गोदामास बुधवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास आग लागली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे केंद्रप्रमुख प्रभाकर उमराटकर यांनी पथकासमवेत घटनास्थळी धाव घेतली. अग्निशामक दलाच्या जवानांनी पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली. हे मदतकार्य सुरू असताना वारजे अग्निशामक केंद्रातील जवान अक्षय गायकवाड यांच्या खांद्याला किरकोळ दुखापत झाली. त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.