पिंपरी : न्यायालयाच्या आदेशाने घराचा ताबा घेण्यासाठी आलेल्या वकील, फायनान्स कंपनीचे अधिकारी व पोलिसांना घर मालक आणि घरातील सदस्यांनी धक्काबुक्की करत शासकीय कामात अडथळा निर्माण केला. ही घटना बुधवारी (दि. ११) सकाळी मोरेश्वर रेसिडेन्सी, दापोडी येथे घडली. अनिल भंडाराम चौधरी (वय २५), कमला अनिल चौधरी (वय २८), भंडाराम जोधाराम चौधरी (वय ४९), पालीदेवी भंडाराम चौधरी (वय ४०, चौघे रा. दापोडी), मकरंद शंकरदेव (वय ४८, रा. कात्रज) अर्शी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. विशाल व्यंकटराव मनाळे (वय २९, रा. पुणे) यांनी दापोडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
आरोपी चौधरी यांच्या घराचे हप्ते थकल्याने एल अँड टी फायनान्स कंपनीने न्यायालयाकडून घराचा ताबा घेण्याचा आदेश घेतला. त्यानुसार कंपनीचे वकील विशाल मनाळे, कंपनीचे अधिकारी, पोलीस हे कॅमेऱ्याच्या निगराणीत ताबा घेण्याची कारवाई करण्यासाठी गेले. त्यावेळी आरोपींनी मनाळे, कंपनीचे अधिकारी आणि पोलिसांच्या अंगावर धावून येत शासकीय कामात अडथळा निर्माण केला.