पुणे : पुणे शहरातील भापकर व पारखी यांचा दि. २१ डिसेंबर रोजी विवाह सोहळा शुभारंभ लॉन्स येथे संपन्न झाला. विवाहाच्या दिवशी या जोडप्याने एका निर्णयाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या विवाह सोहळ्यातील काही अनावश्यक खर्च टाळत दोन्ही कुटुंबियांनी मुख्यमंत्री सह्यात निधीस पंचवीस हजार रुपये आर्थिक साह्य केले आहे. सदर योजनेद्वारे राज्यातील दिन दुबळ्या गरजू रुग्णांना मुख्यमंत्री सह्यात निधी द्वारे आर्थिक सहकार्य केले जाते.
कौतुकास पात्र अशा उपक्रमास सदर कुटुंबियांना मार्गदर्शन करणारे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे स्वीय सहायक मंगेश चिवटे यांचाकडे हा धनादेश सुपर्द करण्यात आला आहे. यावेळी माजी आमदार रविंद्र धंगेकर, युवराज काकडे, योगेश समेळ,अभिजीत मोडक, सुनील पांडे, उमेश चव्हाण, प्रवीण कोकाटे, दिलीप बहिरट, शेखर जावळे, गणेश यादव, शिवकुमार नेलगे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.