ICC Champions Trophy 2025 : क्रिकेट जगतातून मोठी बातमी समोर आली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने आगामी आणि बहुप्रतिक्षित चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. या स्पर्धेत फायनलसह एकूण 15 सामने होणार असून या स्पर्धेत एकूण 8 संघ सहभागी होणार आहेत. या 8 संघाना 4-4 नुसार 2 गटात विभागण्यात आलं आहे.
आयसीसीने याबाबतची माहिती सोशल मीडियावरुन दिली आहे. स्पर्धेचं आयोजन हे 19 फेब्रुवारी ते 9 मार्च दरम्यान करण्यात आलं आहे. पाकिस्तानकडे स्पर्धेच्या यजमानपदाचा मान असला तरी मात्र टीम इंडियाचे सामने हे त्रयस्थ ठिकाणी होणार असल्याची माहिती समोर येत आहे.
8 संघात रंगणार थरार..
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी एकूण 8 संघांना 2 गटात विभागण्यात आलं आहे. ए ग्रुपमध्ये टीम इंडियासह एकूण 3 आशियाई संघ आहेत. टीम इंडिया, पाकिस्तान, बांगलादेश आणि न्यूझीलंडचा समावेश आहे. तर बी ग्रुपमध्ये दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान आणि इंग्लंडचा समावेश आहे. या स्पर्धेतील सलामीचा सामना हा यजमान पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात रंगणार आहे. तर साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यामध्ये 2 मार्चला इंडिया विरुद्ध न्यूझीलंड आमनेसामने उभे थकणार आहे.