बापू मुळीक
पुरंदर : परिंचे (ता. पुरंदर ) खोऱ्यात गेली अनेक वर्ष पिलानवाडी धरणातून येणाऱ्या पाण्याची समस्या आहे. यावर योग्य तो निर्णय करण्याचा प्रयत्न करणार आहोत. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी अनेक विकास कामे केली आहेत. तालुक्यातील हे सर्व सिंचनाचे अडचणी कायमस्वरूपी सोडवू. या भागातील नेते गेल्या पंधरा वर्षापासून नागरिकांना गुंजवणीच्या पाण्यावर दिशाभूल करीत आहेत. असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार व माजी सनदी अधिकारी संभाजीराव झेंडे यांनी व्यक्त केले.
परिंचे येथे प्रचाराच्या कोपरा बैठकीत संभाजीराव झेंडे बोलत होते. यावेळी पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष प्रा. दिगंबर दुर्गाडे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य दत्ता झुरंगे, शामकांत भिंताडे, बाळासाहेब कामठे, अमित झेंडे, उत्तम धुमाळ, ऋतुजा ताई धुमाळ, विराज काकडे, शरद जगताप, वंदनाताई जगताप, राजेंद्र खैरे, बळीराम सोनवणे आदी उपस्थित होते. पिंपळे, बोराळवाडी, पांगारे, खेंगरेवाडी, पिलानवाडी, कांबळवाडी, यादव वाडी ,हरगुडे, सटलवाडी, परिंचे, माहूर, मांढर, दवणेवाडी, धनकवडी, काळदरी, बांदलवाडी, बहिरवाडी, पानवडी, सुपे ,येथील मतदारांशी त्यांनी संवाद साधला.
यावेळी प्रा. दिगंबर दुर्गाडे म्हणाले की पुरंदर विधानसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विचाराचा आमदार निवडून द्यायचा आहे. संभाजीराव झेंडे यांना संधी मिळाल्याने आपण सर्वांनी रात्रीचा दिवस करून यश प्राप्त करायचे आहे. यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पुरंदर तालुका अध्यक्ष बळीराम सोनवणे यांनी महायुतीचे उमेदवार संभाजीराव झेडे यांना पाठिंबा दिला आहेच.