Thursday, November 19, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

12 वीच्या सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्याने संतापलेला बाप बनला मारेकरी; जबर मारहाण केल्याने 17 वर्षीय तरुणीचा मृत्यू

Shreya Varkeby Shreya Varke
Monday, 23 June 2025, 8:25

आटपाडी: नेलकरंजी, आटपाडी येथे शिक्षक असलेल्या पित्याने आपल्याच पोटच्या मुलीचा जीव घेतल्याची मन सुन्न करणारी घटना उघडकीस आली आहे. बारावीच्या सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्याच्या रागातून वडिलांनी केलेल्या अमानुष मारहाणीत १७ वर्षीय साधना धोंडिराम भोसले या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणी तिचे वडील, धोंडिराम भगवान भोसले यांना आटपाडी पोलिसांनी खुनाच्या आरोपाखाली अटक केली आहे.

गावच्या माध्यमिक शाळेत शिक्षक असलेल्या धोंडिराम भोसले यांची मुलगी साधना अभ्यासात हुशार होती. दहावीत ९२.६०% गुण मिळवून तिने शाळेत पहिला क्रमांक पटकावला होता आणि डॉक्टर बनण्याचं तिचं स्वप्न होतं. तिच्या शिक्षणासाठी कुटुंबीयांनी खासगी शिकवणीही लावली होती. मात्र, नुकत्याच झालेल्या एका सराव परीक्षेत तिला अपेक्षेप्रमाणे गुण मिळाले नाहीत.

कमी गुण मिळाल्याच्या कारणावरून शुक्रवार, २१ जूनच्या रात्री वडील धोंडिराम यांनी साधनाला जाब विचारला. “एवढा खर्च करतोय, डॉक्टर कशी होणार,” अशा शब्दांत त्यांनी तिला खडसावलं. त्यावेळी साधनाने, “पप्पा, तुम्हालाही कमी गुण मिळाले होते, तुम्ही काय कलेक्टर झालात का? शिक्षकच झालात ना?” असं प्रतिउत्तर दिलं. हे ऐकताच धोंडिराम यांचा संताप अनावर झाला.

रागाच्या भरात त्यांनी घरातच असलेल्या दगडी जात्याच्या लाकडी खुंट्याने साधनाला बेदम मारहाण केली. तिला पोटातही लाथा मारल्या. आईने थांबवण्याचा प्रयत्न केला, पण काही वेळाने त्यांनी पुन्हा तिला मारहाण केली. त्या रात्री अनेक वेळा साधनाला मारहाण झाल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. या अमानुष मारहाणीत साधनाच्या डोक्याला आणि शरीरावर गंभीर जखमा झाल्या.

शनिवारी सकाळी साधना अस्वस्थ होती. तिला तातडीने दवाखान्यात न नेता धोंडिराम भोसले शाळेच्या योग दिनाच्या कार्यक्रमासाठी गेले. घरी परतल्यानंतर त्यांना साधना बेशुद्धावस्थेत आढळली. घाबरलेल्या अवस्थेत त्यांनी साधनाला सांगली येथील रुग्णालयात आणलं आणि ती बाथरूममध्ये पडून जखमी झाल्याचं सांगितलं. पण, उपचार सुरु होण्यापूर्वीच साधनाने प्राण सोडले होते.

शवविच्छेदनातून साधनाच्या शरीरावर मारहाणीचे अनेक गंभीर व्रण आढळले आणि तेव्हाच हा सर्व प्रकार उघडकीस आला. पोलीस चौकशीत सत्य समोर आल्यानंतर, साधनाची आई प्रीती भोसले यांनी आपल्याच पतीविरोधात फिर्याद दिली. पोलिसांनी धोंडिराम भोसले यांना अटक केली असून, न्यायालयाने त्यांना २४ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेने संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

UPI वापरकर्त्यांनो लक्ष द्या! उद्या तब्बल ४५ मिनिटं UPI सेवा राहणार बंद; नेमकं कारण काय?

Wednesday, 18 November 2026, 22:52

दिल्लीत साडेतीन तास चालली पंतप्रधानांची अत्यंत महत्त्वाची बैठक; पीएम मोदींनी मंत्र्यांना दिले थेट कडक निर्देश!

Wednesday, 18 November 2026, 21:34

मटण खायला बोलावलं अन् जावयानं अख्ख्या सासुरवाडीला संपवलं! झोपेच्या गोळ्या, वरवंट्यानं डोकं ठेचलं; कपडे काढून बाथरूममध्ये नेत ….

Wednesday, 18 November 2026, 21:28

उरुळी कांचन येथील 30 वर्षीय तरुण व्यावसायिकाची गळफास घेऊन आत्महत्या; परिसरात हळहळ!

Wednesday, 18 November 2026, 21:20

पुण्यात ऑनलाईन पिस्टल विक्रीचा प्रकार! सुनसान टेकडीवर भेटण्याचा प्लॅन; पोलिसांनी टीप मिळताच सापळा रचला अन्…

Wednesday, 18 November 2026, 19:56

फर्ग्युसन रस्त्यावरील अतिक्रमणांवर अखेर महापालिकेचा हातोडा; आयुक्त स्वतः उतरले रस्त्यावर, २४,५०० चौरस फुटांवरील बांधकामे हटवली!

Wednesday, 18 November 2026, 19:32
Next Post

यवत येथे श्री काळभैरवनाथ मंदिराशेजारी कचऱ्याचे साम्राज्य

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp