नाशिक : कसारा घाटात भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे ट्रक पलटी झाला. यामध्ये एकाचा मृत्यू झाला, तर एक जण जखमी झाला आहे. जखमीला उपचारासाठी जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ट्रक पलटी झाल्यानंतर काही काळ कसारा घाटात वाहतूक कोंडी झाली होती. थोड्यावेळानंतर वाहतूक सुरळीत झाली.
मिळलेल्या माहितीनुसार, मुंबई नाशिक महामार्गावर नवीन कसारा घाटात हा अपघात झाला. नवीन कसारा घाटतून उतरत असताना चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला असल्याची माहिती मिळत आहे. या अपघातानंतर ट्रक पलटी झाला. त्यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
ट्रक काही अंतरापर्यंत फरफटत गेल्याने अपघात झाला. या अपघातात एक जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. ट्रकमध्ये अडकलेल्या व्यक्तीला दीड तासाच्या अथक प्रयत्नानंतर महामार्ग पोलीस व रूट पेट्रोलिंग टीमच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आले. जखमी व्यक्तीला कसारा येथील रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.