नाशिक : नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावर पिंपरी फाटा येथे भीषण अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने कार दुभाजकावर जाऊन आदळल्यामुळे हा अपघात झाला आहे. यामध्ये तीन जण जागीच ठार झाल्याची माहिती मिळत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शिर्डी येथे दर्शन घेऊन परतत असताना हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. मारुती स्विफ्ट कार चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने कार दुभाजकावर जाऊन आदळली. त्यानंतर कार विरुद्ध लेनवर जाऊन पलटी झाली. हा अपघात इतका भीषण होता की गाडीचा अक्षरश: चुराडा झाला आहे.
या अपघातात तीन जण जागीच ठार झाले असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना पुढील उपचारासाठी एसएमबीटी हॉस्पिटलला दाखल करण्यात आले असल्याची माहिती मिळत आहे.