लहू चव्हाण
Farm News : पाचगणी : परदेशातून आणलेल्या स्ट्राॅबेरी रोपांची लागवड करुन महाबळेश्वर तालुक्यातील शेतकऱ्यांनी भरघोस उत्पादनातून आर्थिक प्रगती साधावी असे आवाहन स्ट्रॉबेरी ग्रोव्हर्स असोसिएशनचे अध्यक्ष नितीन भिलारे यांनी केले.
इटली येथून आणलेल्या स्ट्रॉबेरी रोपांचे वाटप
भिलार (ता. महाबळेश्वर) येथील श्रीराम विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून इटली येथून आणलेल्या स्ट्रॉबेरी रोपांचे पुजन करुन परिसरसतील शेतकऱ्यांना (Farm News ) वाटप प्रसंगी नितीन भिलारे बोलत होते.
यावेळी जावळी-महाबळेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य राजेंद्र भिलारे, शिंदे गटाचे नेते प्रवीण भिलारे,सुरेंद्र भिलारे, विश्वनाथ भिलारे, सरपंच शिवाजी भिलारे, सुनील भिलारे, रमेश दाभाडे, विश्वनाथ पाडळे, गणपत पार्टे आदी मान्यवर उपस्थित होते.
यापुढे बोलताना भिलारे म्हणाले, “स्ट्रॉबेरीचे पीक शेतकऱ्यांसाठी तारणहार असून पिकासाठी भिलार व परिसरातील वातावरण पूरक असल्याने कमी जागेत मोठ्या प्रमाणात पिक घेता येते. (Farm News) स्ट्राॅबेरी उत्पादक शेतकऱ्यांना नाबेला, फ्लेमिया, मुरानो, विवरा, एम२, या प्रकारच्या स्ट्रॉबेरी रोपे असून त्या रोपांचे पूजन करून शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले.यावेळी भिलार व परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.”
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Farmer News : चिया कडधान्यातून शेतकरी मालामाल ; महाराष्ट्रातील पहिलेच पीक…!
Farmer News : जिल्ह्यातील ३६६ शेतकऱ्यांचे ४९ कोटींचे प्रस्ताव मंजूर…!