लोणी काळभोर (पुणे) : “पुणे प्राईम न्यूज” हे जनसमाज मनाचा आरसा आहे. यामधी शेती, आरोग्य, समाजसेवा, तसेच आदी क्षेत्रात भरीव कार्य करून मागील एक वर्षात न्यूज पोर्टलने सामाजिक बांधिलकी जोपासली असल्याचे प्रतिपादन एस. जी. ए ग्रुप ऑफ कंपनीचे CEO शंकर गायकवाड यांनी केले.
लोणी काळभोर (ता. हवेली) येथील “पुणे प्राईम न्यूज” च्या पहिल्या विशेष दिवाळी विशेष अंकाचे प्रकाशन एस. जी. ए ग्रुप ऑफ कंपनीचे CEO शंकर गायकवाड, मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष सिताराम लांडगे व हवेली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेंद्र उर्फ बापुसाहेब काळभोर यांच्या हस्ते रविवारी (ता. २३) सांयकाळी सहा वाजता पार पडले. यावेळी गायकवाड बोलत होते.
या प्रकाशन सोहळ्याला बाधकाम व्यावसायिक देवीदास उर्फ अण्णा कदम, एस. जी. ए ग्रुप ऑफ कंपनीचे संचालक व माझे बंधु लक्ष्मण दांडगे, एस. जी. ए ग्रुप ऑफ कंपणीचे संचालक रविशेठ गिरी, दिपक गाढवे, उद्योजक आशिष गायकवाड, शामराव पवार, मल्हारजी पांडे, मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष पंढरीनाथ नामगुडे, जेष्ठ पत्रकार तुळशीराम घुसाळकर, सचिन माथेफोड, संदिप बोडके, विजय काळभोर, सचिन सुंबे, चंद्रकांत दुंडे, अमोल अडागळे, नितीन करडे, दिगंबर जोगदंड, हनुमंत सुरवसे, श्रीनिवास पाटील, विशाल कदम, अशिष गायकवाड, राजेंद्र हजगुडे, विशाल वेदपाठक, स्वप्निल कदम, दशरथ गोते, हनुमंत चिकणे, प्रिया बंडगर, फिझा शेख, अॅड. आकांक्षा दांडगे व आकाश दांडगे आदी उपस्थित होते.
मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष सिताराम लांडगे म्हणाले,” “पुणे प्राईम न्यूजने” अडचणीतल्या लोकांच्या मागे उभे राहण्याचे, त्यांचा आत्मविश्वास वाढविण्याचे काम केले आहे. नागरिकांनीहि त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. काही दिवसात जिल्ह्यासह राज्यात लवकरच सर्वत्र “पुणे प्राईम न्यूज” हे नाव ऐकायला मिळणार आहे.”
हवेली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेंद्र उर्फ बापुसाहेब काळभोर म्हणाले, “थोड्याच दिवसात “पुणे प्राईम न्यूजने” जिल्ह्यात आपला दबदबा निर्माण केला आहे. मागील सहा महिन्यात वाचकांनी दिलेला प्रतिसाद पाहता “पुणे प्राईम न्यूजचे महाराष्ट्रात नाव होईल. त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.” सदर कार्यक्रमाला उपस्थित पत्रकार बांधव व आलेल्या मान्यवरांचे आभार “पुणे प्राईम न्यूजचे” संपादक जनार्दन दांडगे यांनी मानले.