पुणे : पुणे शहरातील सीसीटीव्ही प्रकल्पासाठी तब्बल 61 रस्त्यांवर खोदकाम केले जाणार आहे. वाहतूक कोंडीचा सामना करणाऱ्या पुणेकरांना आता या रस्त्याच्या खोदकामाचा ही मनस्ताप सहन करावा लागणार आहे. या खोदकामासाठी वाहतूक पोलिसांनी कठोर अटींसह पुणे महापालिकेला परवानगी दिली आहे.
खोदकामाच्या रस्त्यासाठी पुणे महापालिकेला वाहतूक पोलिसांनी तंबी दिली आहे. सर्व खोदकाम ३१ मे पूर्वी करावी लागतील. अन्यथा संबंधित ठेकेदारांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा थेट इशारा वाहतुक पोलिसांनी दिला आहे. यासाठी सर्व कामांचे वेळापत्रक महापालिकेडून मागवण्यात आले आहे.
शहरातील खोदकाम होणारे प्रमुख भाग
कोथरूड, वारजे, येरवडा, बाणेर, हडपसर, बालेवाडी,बी.टी कवडे रोड,कोंढवाट, बिबवेवाडी, धानोरी,शिवाजीनगर, सारसबाग
दरम्यान या खोदकामामुळे संबंधित परिसरांमध्ये वाहतूक कोंडी, पर्यायी मार्ग तसेच थोडीशी असुविधा निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी प्रवास योजना आधीच आखावी, असं आवाहन करण्यात आले आहे.