नवी दिल्ली : सध्या टेक्नॉलॉजीच्या युगात अनेक गॅजेट्स लाँच केले जात आहेत. त्यात प्रसिद्ध कंपनी Marshall ने आपले दोन नवीन पोर्टेबल स्पीकर्स लाँच केले आहेत. Emberton III आणि Willen II हे स्पीकर्स लाँच केले आहेत. यामध्ये फास्ट चार्जिंगसह अनेक बेस्ट असे फीचर्स देण्यात आले आहेत.
कंपनीच्या मते, मार्शल एम्बर्टन III 32 तासांपेक्षा जास्त बॅटरी लाईफ देते. मार्शल विलेन II पोर्टेबल स्पीकर 17 तासांपेक्षा जास्त प्ले-टाईम मिळत असल्याचा दावा केला जातो. यामध्ये फास्ट चार्जिंग सपोर्टसह अनेक चांगले फीचर्स देण्यात आले आहेत. या फास्ट चार्जिंगच्या फीचर्समुळे युजर्सला फक्त 20 मिनिटांच्या चार्जसह 6 तास आणि 5.5 तासांपर्यंत प्लेबॅकचा आनंद घेता येणार आहे.
एम्बर्टन III आणि Willen II हे चांगल्या ऑडिओ फीचर्ससह येत आहे. दोन्ही पोर्टेबल स्पीकर्समध्ये USB-C पोर्टचा समावेश आहे. या IP67 डस्ट आणि वॉटरप्रूफ रेटिंगही आहे. हा स्पीकर पाण्यात पडला तरी साधारण अर्धा तास तसाच चालू राहू शकतो, असा कंपनीचा दावा आहे. हँड्स-फ्री कॉल्ससाठी इनबिल्ट मायक्रोफोन आणि ब्लूटूथ LE ऑडिओ-रेडी आहेत.