आपण सुंदर दिसावं असं अनेकांना वाटत असतं. त्यानुसार, अनेक प्रयत्न केले जातात. त्यात इसेन्शिअल ऑईल फायद्याचे ठरते. हे ऑईल चेहऱ्यावर लावल्यास ग्लोईंग स्कीन मिळू शकते. हे ऑईल अनेक गुणांनी परिपूर्ण असे आहे.
इसेन्शिअल ऑईल हे फुलांमधून लॅव्हेंडर काढले जाते तर लेमनग्रास वनस्पतीच्या ताज्या किंवा अंशतः वाळलेल्या पानांच्या वाफेने तेल काढले जाते. त्याच्या मदतीने तुम्ही डोकेदुखी, तणाव यांसारख्या शरीराच्या अनेक समस्यांपासून मुक्त होऊ शकता. या तेलाचे काही थेंब नारळ किंवा बदामाच्या तेलात मिसळून त्वचेवर लावावे. पाण्याने भरलेल्या स्प्रे बाटलीमध्ये इसेन्शिअल ऑईलचे काही थेंब टाका आणि स्वच्छ केल्यानंतर चेहऱ्यावर स्प्रे करा.
मॉइश्चरायझर किंवा सीरममध्ये मिसळूनही तुम्ही इसेन्शिअल ऑईल लावू शकता. ट्री टी हे इसेन्शिअल ऑईल त्याच्या अँटी-बॅक्टेरियल, अँटी-फंगल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्मांसाठी ओळखले जाते. त्वचेवरील मुरुम, कोंडा आणि त्वचेच्या टाळूच्या समस्यांवर उपचार करण्यासाठी हे उपयुक्त ठरू शकते. या तेलाच्या वापराने ग्लोईंग स्कीन मिळू शकते.