EPFO Balance Check : ईपीएफओ (EPFO) हा ग्राहकांना युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) व्यतिरिक्त पीएफ(PF) शिल्लक तपासण्याची सुविधा प्रदान करते. परंतु, कधी कधी आपल्याला काही गरज भासली की पीएफ किती शिल्लक आहे ती तपासावी लागते, त्यावेळी आपल्याला काही केल्या UAN क्रमांक आठवत नाही, तेव्हा ही पद्धत आपल्यासाठी खूप फायदेशीर ठरु शकते.
बहुतेक पीएफ (PF) खातेधारकांना याबद्दल माहिती नाहीयेय. तर मग तुम्ही ही सोपी पद्धत जाणून घ्याच, ज्याच्या मदतीने तुम्ही कमी वेळेत युनिव्हर्स अकाउंट नंबरशिवाय (UAN) पीएफ बॅलन्स जाणून घेऊ शकता.
SMS पाठवून जाणून घ्या PF खात्यातील निधी
ज्या ग्राहकांना त्यांचा पीएफ फंड जाणून घ्यायचा आहे त्यांना ७७३८२९९८९९ या क्रमांकावर SMS पाठवावा लागेल. यासाठी तुम्हाला काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील ज्या येथे दिल्या आहेत:
- सुरवातीला तुमच्या नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावरून ७७३८२९९८९९ या क्रमांकावर SMS पाठवा.
- या मेसेजमध्ये, “EPFOHO UAN” टाइप करुन घ्या.
- तसेच UAN क्रमांकानंतर, तुमच्या पसंतीच्या भाषेकरिता भाषा कोड टाइप करा. जसे की, जर तुम्हाला इंग्रजीमध्ये माहिती मिळवायची असेल तर तुम्ही “EPFOHO UAN ENG” टाइप कराल.
- SMS पाठवल्यानंतर, तुम्हाला तुमचा PF शिल्लक असलेला SMS पाहायला मिळेल. अट एवढीच आहे की तुमचा मोबाईल क्रमांक तुमच्या PF खात्यात नोंदणीकृत असायला हवा.
हे आहेत PFचे फायदे
- पीएफमधून पैसे काढण्यासाठी कर्मचाऱ्यांना कमी व्याजदराने कर्जही मिळू शकते. तसेच निवृत्तीनंतरही आर्थिक सुरक्षा मिळते.
- पीएफ ही एक बचत योजना आहे जी कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर आर्थिक सुरक्षा प्रदान करण्यात मदत करते.
- पीएफमध्ये जमा केलेल्या रकमेवरही व्याज मिळते, ज्यामुळे कर्मचाऱ्यांचे निवृत्तीनंतरचे फायदे वाढतात.
कर्मचाऱ्यांना PFमधून पैसे काढण्यासाठी या अटी कराव्या लागतात पूर्ण
- कर्मचाऱ्याचे वय 58 वर्षे असायला पाहिजे
- कर्मचाऱ्याने किमान 5 वर्षे PFमध्ये योगदान दिलेले असावे.
- PF मधून पैसे काढण्यासाठी कर्मचारी Online किंवा Offline अर्ज करू शकतात.