लोणी काळभोर : पेरणेफाटा (ता. हवेली) येथील विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी राज्यातील व परराज्यातील नागरीक, अनुयायी मोठ्या संख्येने 1 जानेवारीला अपस्थित राहतात. पुणे- अहमदनगर मार्गावरील पेरणे फाटा येथे गर्दीमुळे वाहतुक कोंडी होऊ नये व वाहतूक सुरळीत राहावी. यासाठी पुणे सोलापूर महामार्गासह विविध मार्गावरून जड/अवजड वाहनांना अंतर्गत वाहतुकीसाठी आज सोमवारी (ता.30) मध्यरात्री बारा वाजल्यापासून प्रवेश बंदी करण्यात येत आहे. असे आदेश पुणे शहर वाहतूक विभागाचे पोलीस उप आयुक्त अमोल झेंडे यांनी दिले आहे.
पुणे शहरातुन नगर रस्त्याने खराडी बायपास, वाघोली, लोणीकंद, थेऊर फाटा- तुळापुर फाटा – भिमा कोरेगांव, पेरणे गावपर्यंत (भिमा नदी ब्रीज) सर्व प्रकारच्या वाहनांना वाहतुकीस प्रवेश बंद करण्यात येत आहे. इंद्रायणी नदीवरील आळंदी-तुळापुर रोडवरील मरकळ ब्रिज हा पुल जड वाहनांना हॉईट बॅरिअर मुळे बंद करण्यात आला असल्याने सदर ठिकाणाहून केवळ अनुयायांच्या हलक्या चारचाकी वाहनांना प्रवेश दिला जाईल. अनुयायांच्या बस/टेम्पो, तत्सम वाहनांनी पुर्वीच चाकण-शिक्रापुर मार्गाचा वापर करावा.
दरम्यान, जड/अवजड वाहनांना (ट्रक, डंपर, मिक्सर, बल्कर, जे.सी.बी. रोड रोलर, मल्टी एक्सल वाहनांसाठी) खालील ठिकाणाच्या पुढे प्रवेश बंदी करण्यात येत आहे. सर्व वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करुन इच्छित स्थळी जावे. वाहनांना आज सोमवारी (ता.30) रात्री बारा वाजल्यापासून बंदी घालण्यात आली आहे. ती बुधवारी (दि. 01 जानेवारी) रात्री बारा वाजेपर्यंत अशी 48 तास बंदी घालण्यात आली आहे. त्यानंतर हा मार्ग सर्व प्रकारांच्या वाहनांसाठी खुला करण्यात येणार आहे. तर यामधून अत्यावश्यक सेवेतील वाहने (उदा. फायरब्रिगेड, पोलीस वाहने, रुग्णवाहिका पीएमपीएल बस, अनुयायी व स्थानिक नागरिक इ) वगळण्यात आली आहेत.
या मार्गावरून सर्व वाहनांना वाहतुकीस बंदी…
-मरकळ नदीब्रिज तुळापुर फाटा पर्यंत सर्व प्रकारची वाहने
-वाघोली केसनंद फाटा-केसनंद गांव-मगर वस्ती-खंडोबाचा माळ-लोणीकंद (थेऊर फाटा) पर्यंत
-सोलापूर रोड (थेऊर फाटा) थेऊर गांव-कोलवडी-केसनंद गांव मगर वस्ती – खंडोबाचा माळ- लोणीकंद (थेऊर फाटा)
-विश्रांतवाडी लोहगांव वाघोली व वाघोली-लोहगांव मार्ग विश्रांतवाडीकडे जाणाऱ्या सर्वप्रकारच्या वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.
या पर्यायी मार्गाचा वापर करावा…
-थेऊर फाटा, लोणीकाळभोर पासुन पुढे
-हॅरीष ब्रिज, खडकी
-बोपखेल फाटा, विश्रांतवाडी
-राधा चौक, बाणेर,
-नवले ब्रिज, वारजे,
-कात्रज चौक, कात्रज,
-खडीमशीन चौक, कोंढवा.
-मंतरवाडी फाटा, फुरसुंगी,
-मरकळ ब्रिज पासुन पुढे प्रवेश बंद राहील.