IND vs ENG: लंडन: इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने भारताविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी संघ जाहीर केला आहे. 25 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या या कसोटी मालिकेसाठी इंग्लंडने 16 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. स्टार अष्टपैलू सॅम कुरन आणि यष्टिरक्षक फलंदाज जोस बटलर यांना या संघात स्थान मिळालेले नाही. मात्र, संघात तीन नव्या चेहऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे.
भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंडने संघात तीन नव्या चेहऱ्यांचा समावेश केला आहे. त्यात शोएब बशीर, टॉम हार्टले आणि गस ऍटकिन्सन यांचा समावेश आहे. ओली पोप हा संघाचा उपकर्णधार आहे. इंग्लंडने टॉम हार्टले, जॅक लीच आणि रेहान अहमद या तीन फिरकीपटूंचा आपल्या संघात समावेश केला आहे.
भारतातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंड संघात जो रूट, जॉनी बेअरस्टो, हॅरी ब्रूक, जॅक क्रॉली, बेन डकेट, बेन स्टोक्स, शोएब बशीर, बेन फॉक्स आणि ऑली पोप यांच्या रूपात नऊ फलंदाज आहेत. टॉम हार्टले, जॅक लीच आणि रेहान अहमद हे तीन फिरकीपटू आहेत. वेगवान गोलंदाजीमध्ये जेम्स अँडरसन, गस ऍटकिन्सन, ऑली रॉबिन्सन आणि मार्क वुड आहेत.
जानेवारीमध्ये बेन स्टोक्सचा संघ पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारत दौऱ्यावर येणार आहे. या मालिकेतील पहिली कसोटी 25 जानेवारीपासून हैदराबादमध्ये खेळवली जाणार आहे. यानंतर दुसरी कसोटी 2 फेब्रुवारीपासून वायझॅग, तिसरी कसोटी 15 फेब्रुवारीपासून राजकोटमध्ये, चौथी कसोटी 23 फेब्रुवारीपासून रांचीमध्ये आणि शेवटची कसोटी 7 मार्चपासून धरमशाला येथे खेळवली जाईल.
भारताविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंड संघ – बेन स्टोक्स (कर्णधार), रेहान अहमद, जेम्स अँडरसन, गस ऍटकिन्सन, जॉनी बेअरस्टो (यष्टीरक्षक), शोएब बशीर, हॅरी ब्रूक, जॅक क्रॉली, बेन डकेट, बेन फॉक्स (यष्टीरक्षक) ), टॉम हार्टले, जॅक लीच, ऑली पोप, ऑली रॉबिन्सन, जो रूट आणि मार्क वुड.
भारत-इंग्लंड कसोटी मालिकेचे पूर्ण वेळापत्रक
पहिली कसोटी: भारत विरुद्ध इंग्लंड, 25-29 जानेवारी, हैदराबाद
दुसरी कसोटी: भारत विरुद्ध इंग्लंड, 2-6 फेब्रुवारी, वायझॅग
तिसरी कसोटी: भारत विरुद्ध इंग्लंड, 15-19 फेब्रुवारी, राजकोट
चौथी कसोटी: भारत विरुद्ध इंग्लंड, 23-27 फेब्रुवारी , रांची
5वी कसोटी: भारत विरुद्ध इंग्लंड, 7-11 मार्च, धरमशाला