पुणे : नामदार गोपाळ कृष्ण गोखले पथ (फर्ग्युसन रस्ता) परिसरातील पदपथावर बेकायदा पथारीवाल्यांविरुद्ध कारवाई करणाऱ्या अतिक्रमण विभागातील पथकाला धक्काबुक्की करण्यात आल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी डेक्कन पोलिसांनी महिलेसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. सोमवारी सायंकाळी फर्ग्युसन रस्त्यावरील सागर आर्केड परिसरात महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई केली होती.
याबाबत महापालिकेच्या अतिक्रमण विभागातील कर्मचारी सचिन घेंगे (वय २९, रा. मांजरी) यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, फर्ग्युसन रस्त्यावरील पदपथावर बेकायदा पथारी थाटण्यात आल्या आहेत. या भागात फेरीवाल्यांकडून बेकायदा व्यवसाय केला जातो. पादचाऱ्यांना पदपथावरुन चालता देखील येत नसल्याने महापालिकेकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या. यापार्श्वभूमीवर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून बेकायदा पथारी व्यावसायिक, फेरीवाल्यांविरुद्ध कारवाई सुरू करण्याथ आली आहे.
नेमकं काय घडलं?
सोमवारी सायंकाळी फर्ग्युसन रस्त्यावरील सागर आर्केड परिसरात बेकायदा फेरीवाल्यांविरुद्ध कारवाई करण्यात येत होती. त्यावेळी महिलेसह चौघांकडून अतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करण्यात शिवीगाळ के. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी चौघांविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला.