राहुलकुमार अवचट
यवत : दौंड तालुक्यातील जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने ग्रामीण महिलांसाठी रोजगार मार्गदर्शन व गुणगौरव पुरस्कार सोहळ्याचे रविवार दि २० रोजी यवत येथील समृद्धी गार्डन मंगल कार्यालय येथे आयोजन करण्यात आले आहे.
दुपारी १ वा जिजाऊ ब्रिगेड जिल्हाध्यक्षा जयश्रीताई गटकुळ, अहमदनगर जिल्हासंघटक संजय वाघ व मान्यवरांच्या हस्ते जिजाऊ वंदना करण्यात येईल. शाहीर शितल साठे व संभाजी गायकवाड यांच्या शायरीतुन समाज प्रबोधन रुजवण्याचा संकल्प करून दौंड जिजाऊ ब्रिगेड तालुका अध्यक्षा शिवमती सारिका भुजबळ व महिला पदाधिकारी सहकाऱ्यांनी ग्रामीण भागातील महिलांसाठी रोजगार मार्गदर्शन व विविध क्षेत्रातील मान्यवरांजा गुणगौरव पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले आहे या कार्यक्रमाचे संयोजक संभाजी ब्रिगेड जिल्हा संघटक भरत भुजबळ व पदाधिकारी यांनी नियोजन केले आहे.
यावेळी रविवारी दु .१ ते ३ प्राध्यापक डॉक्टर अंजली कदम-नारायणे व प्राध्यापक संजय वायाळ हे बचत गट व शासकीय अनुदान बँकिंग कर्ज याबद्दल मार्गदर्शन करणार आहेत.
दुपारी ३ वा प्राध्यापक सुधाकर फुले (उद्योजकता विकास मार्गदर्शक प्रशिक्षक) यांचे महिला स्वयंरोजगार आर्थिक सक्षमीकरण सबलीकरण व उद्योग संधी, शासनाच्या अनुदान कर्ज योजनांची माहिती, सर्व शासकीय महामंडळाच्या योजना महिला बचत गट व्यवसाय गट उभारणी, उद्योग व्यवसाय मार्केटिंग कौशल्य या संदर्भात मार्गदर्शन करणार आहेत. दु ४ वा प्रवक्ते जगदीश ओव्हाळ, अमर हजारे, बिभीषण गदादे, मानसिकता, आरोग्य , उद्योग महिलांना असणारे सर्व क्षेत्रातील ५० टक्के आरक्षण, याबाबत मार्गदर्शन करणार आहेत.
सायंकाळी ५ वा यशस्वी उद्योजक, विशेष सामाजिक, उत्कृष्ट पत्रकारिता, आदर्श शिक्षक, कृषी विभाग, कला विभाग, वृक्ष संवर्धन, आरोग्य विभाग, उत्कृष्ट कवी व लेखक, कर्तुत्ववान पुरुष/ महिला, विशेष कर्तव्यदक्ष अधिकारी, सर्वोत्कृष्ट माता पुरस्कार यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांना दौंड मराठा सेवा संघ प्रणित महाराष्ट्र जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने पुरस्कार देऊन सन्मानित केले जाणार आहे.
या कार्यक्रमाला जिल्ह्यातील विविध मान्यवर व पदाधिकारी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असुन सदर कार्यक्रमास यवत पंचक्रोशीतील नागरिकांनी व महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.