लहू चव्हाण
पाचगणी : पांचगणी ता. महाबळेश्वर मधील न्यू इरा स्कूल, फिदाई अकॅडमी या दोन शाळांमधील कमी केलेल्या कामगारांना तात्काळ कामावर रुजू करून घेण्यासाठी कामगार नेते भगवानराव वैराट यांनी सातारा येथील सहाय्यक कामगार आयुक्त भिसले यांच्याकडे मागणी केली आहे.
महाराष्ट्र राज्य कामगार सुरक्षा दलाचे लोकनेते व कामगार नेते भगवानरावजी वैराट यांच्या नेतृत्वाखाली न्यू इरा स्कूल पाचगणी, फिदाई अकॅडमी स्कूल पाचगणी येथील असणाऱ्या कायम कामगार आणि ठेकेदार कामगार संदर्भात सहाय्यक कामगार आयुक्त भिसले यांना पत्र दिले होते. त्याचे अनुषंगाने आज त्यांच्या कार्यालयात आज बैठक संपन्न झाली.
सदर दोन्ही संस्थेचे व्यवस्थापन आणि कामगार ठेकेदार यांनी कोणतीही लेखी नोटीस न देता. कामगारांना कामावरून कमी करून “औद्योगिक शांतता भंग” केली आहे. तसेच ज्या कामगारांना बेकायदेशीरपणे कामावरून कमी करून अन्य कामगारांना कामावर घेतले होते. हे गैरकृत्य असल्यामुळे व्यवस्थापन आणि सदर ठेकेदार यांच्या गैरकारभाराची सदर सखोल चौकशी करावी. अशी मागणी केली.
महाराष्ट्र राज्य कामगार यांचेवतीने आयुक्त यांच्यापुढे सर्व कामगारांचे प्रश्न समजून घेऊन आयुक्त यांच्यासमोर मांडले. वैराट व कर्मचारी यांनी न्यू इरा स्कूल व्यवस्थापक व ठेकेदार यांना कामगार प्रथा कायद्यांतर्गत आयुक्तांसमोर धारेवर धरले. यावेळी सहाय्यक कामगार आयुक्त सातारा दोन्ही बाजूचे प्रश्न समजून घेतले.
यावेळी बोलताना कामगार आयुक्त भिसले म्हणाले कि, न्यू इरा व्यवस्थापन व सदर असणारा ठेकेदार यांना साहेब यांनी ठेकेदार यांचे व्यवस्थापन पाहणाऱ्या ठेकेदारी पद्धतीने अनेक वर्षांपासून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना तडकाफडकी कामावरून कमी करता येणार नाही. व त्या कामगारांना कामावर तात्काळ रुजू करावे. त्यांचे असणारे नुकसान भरपाई द्यावी.व सदर कामगारांच्या संदर्भात प्रश्न निर्माण झाल्यास महाराष्ट्र राज्य कामगार (रजि) यांच्याशी व सदर कामगारांशी पत्रव्यवहार करून कळवावे.
दरम्यान, दुसऱ्या सत्रात फिदाई अकॅडमी व्यवस्थापनाला बोलवून सदर असणाऱ्या कर्मचाऱ्यांचे प्रश्न व्यवस्थापनाने तात्काळ मार्गी लावावे. असे सहाय्यक कामगार आयुक्त सातारा यांनी सदर बैठकीवेळी निर्णय देण्यात आला आहे.
यावेळी सातारा जिल्हाध्यक्ष शिवाजीराव भिसे, संपर्क प्रमुख सुनील भिसे, कार्याध्यक्षदिलीपजी कांबळे, उपाध्यक्ष शिवाजीराव अवघडे, वाई तालुकाध्यक्ष प्रवीण सपकाळ महाबळेश्वर तालुकाध्यक्ष अभिजीत (सनी) ननावरे, न्यू इरा स्कूल कर्मचारी नितीन वने, विकास भोसले, मुकेश खरात, तुकाराम वाघ, हिराबाई पवार, रंजना तांबे. ठेकेदार कर्मचारी- विनोद मालुसरे, आशा शिवडवकर, भारती कांबळे, सुनील बेलोशे, व इतर कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.