काही माणसे समोर आली की आपल्याला चटकन त्यांना टाळण्याच्या युक्त्यांचा विचार करावासा वाटतो. अनेकदा ही माणसे आपल्याशी बोलताना रटाळ, प्रत्येकाविषयीची नकारात्मक मतेच ऐकवत असतात. त्यामुळे जगात काहीच चांगले नाही, जग विश्वासघातकी वाईट लोकांनीच भरलेले आहे, अशी भावना मनात निर्माण होऊ लागते. त्यामुळे नकारात्मकता दूर करा अन् सकारात्मकतेला आत्मसात करा.
प्रत्येकाविषयी, प्रत्येक घटनेविषयी भीती, अविश्वास किंवा शंका यामधून तो उद्भवतो. त्याची मुळे सहसा आलेल्या काही वाईट अनुभवांचा प्रभाव मनावरून पूर्णपणे पुसून टाकून मन पुन्हा प्रसन्न करण्यात आलेल्या अपयशात दडलेली असतात. आत्मविश्वासाचा अभाव असल्यामुळे इतरांनी आपल्यावर मारलेले शेरेच खरे धरल्यामुळे इतर लोकांविषयी मनात राग निर्माण झालेला असतो. परिणामी, प्रत्येक व्यक्तीचे वागणे, बोलणे या मानसिक रुग्णाला आपल्या विरोधात असल्यासारखे वाटते. तसेच अपयशातून सावरायला शिका. आपल्या बाबतीत काहीच चांगले घडणार नाही, असे वाटू लागते.
कधी तरी लागोपाठ आलेल्या अपयशाच्या अनुभवातून यापैकी काही लोक पूर्णपणे सावरू शकलेले नसतात. यासाठी अर्थातच समुपदेशन आणि मित्र आणि जवळच्या मंडळींनी त्यांचे गैरसमज दूर करण्यासाठी संवाद साधणे हे उपचार आहेत. अशा लोकांचे मन शांत करण्यासाठी काही औषधोपचारही केले जातात.