पुणे : वीज ग्राहकांना वेळेत चालू वीजबिल व थकबाकी भरणे सोईचे व्हावे यासाठी पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यातील महावितरणचे अधिकृत वीज बिल भरणा केंद्र शनिवार दि. २६ व रविवार दि. २७ नोव्हेंबर या साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी कार्यालयीन वेळेत सुरू ठेवण्यात येणार आहे.
पश्चिम महाराष्ट्रात महावितरणची थकबाकी वाढलेली असून थकबाकी वसूल करण्याची मोहीम सुरू आहे. थकबाकीदार ग्राहकांचा थकबाकीपोटी वीज खंडित करण्यात येत आहे.
चालू वीजबिल व थकबाकी भरणे सोईचे व्हावे म्हणून साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी वीजबिल भरणा केंद्रे चालू असणार आहे.
थकबाकीदार सर्व वीजग्राहकांनी थकबाकी व चालू वीजबिलांचा भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
तसेच लघुदाब वर्गवारीतील सर्व वीजग्राहकांना घरबसल्या बिलांचा भरणा करण्यासाठी www.mahadiscom.in ही वेबसाईट तसेच मोबाईल अँपद्वारे ऑनलाईन’ सोय उपलब्ध आहे.