सुरेश घाडगे
परंडा : चेन्नई सुरत ग्रीनफिल्ड हायवे संघर्ष समितीच्या टाकळी शाखा कार्यकारिणीची निवड आज सोमवारी (ता.२२) करण्यात आली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी ज्ञानेश्वर काळे तर उपाध्यक्ष हनुमंत काळे, सचिव विशाल आदलिंगे, उपसचिव राजेंद्र गरड व खजिनदार सचिन काळे यांची निवड करण्यात आली आहे.
चेन्नई सुरत ग्रीनफिल्ड हायवे संघर्ष समितीची स्थापना करण्यात आलेली आहे. या अनुषंगाने तालुक्यातील टाकळी शाखा कार्यकारिणीची निवड सोमवार ( दि. २२ ) तालुक्यातील टाकळी येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आली होती. या बैठकीत वरील शाखा कार्यकारिणीची निवड करण्यात आली आहे.
यावेळी महारुद्र जाधव, विकास ठोंबरे, रणजीत लांडगे, अनिल काळे, लक्ष्मण काळे, सतीश काळे, सुनील काळे, मारुती माळी ,रमेश काळे ,मनोज मिस्कीन, बाप्पा काळे महादेव काळे, भीमा काळे, बाबासाहेब काळे, ऋषीनाथ काळे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्यने उपस्थित होते.
दरम्यान, टाकळी येथून चेन्नई सुरत एक्सप्रेस हायवे जात आहे. मोठया प्रमाणात जमिनीचे संपादन या हायवेसाठी होत आहे. शेतकऱ्यांना जमिनीचा योग्य मोबदला तथा मावेजा मिळावा व विविध मागण्यांसाठी संघर्ष समिती करण्यात आलेली आहे. हरकती घेण्यासाठी दि. २३ रोजी उस्मानाबाद येथील भूसंपादन कार्यालयात जाण्याचा निर्णय घेण्यात आला . तसेच दि २५ पर्यंत संबंधीत शेतकऱ्यांनी हरकती व आक्षेप घ्यावेत. असे आवाहन महारुद्र जाधव यांनी केले .
परंडा तालुक्यातील २१ गाव -शिवारातून हायवे –
हिंगणगांव (बु.), कांदलगाव, सिरसाव, घारगाव, जवळा (नि.), आरणगाव, टाकळी, कुंभेफळ, जाकेपिंपरी, पिस्तमवाडी, साकत (बु), रोहकल, राजूरी, वाडीराजूरी, आनाळा, रत्नापुर, मलकापुर, पांढरेवाडी, उंडेगाव, चिंचपूर (बु.), चिंचपुर (खु.) आदि २१ गाव – शेत शिवारातून हा मार्ग प्रस्तावीत असून भूसंपादन सुरू आहे.