लोणी काळभोर, (पुणे) : येथील शिवराज मनोजराव काळभोर यांची प्रहार पुणे जनशक्ती पक्षाच्या जिल्हा विद्यार्थी संघटना अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. निवडीचे पत्र अनंत पांडुरंग काळे यांच्या हस्ते नुकतेच शिवराज काळभोर यांना देण्यात आले आहे.
शिवराज काळभोर गेले ३ वर्ष प्रहार विद्यार्थी संघटना पुणे जिल्हा उपाध्यक्ष म्हनून काम पाहत होते. अवघ्या १६ व्या वर्षी समाजसेवेचा वसा घेत गेल्या ३ वर्षात अनेक कौतुकास्पद कामे त्यांनी केली आहेत. तसेच कार्यक्षम विध्यार्थी-युवा नेतृत्व हा राज्यस्तरीय पुरस्कार देखिल शिवराज याला प्राप्त झाला आहे.
यावेळी अभिशेख शितोळे, यश गायकवाड, साहिल झगडे, प्रहार विद्यार्थी संघटनेचे तालुका अध्यक्ष सिकंदर शेख, सिद्धांत काळभोर, विद्यार्थी व सर्व प्रहार कार्यकर्ते उपस्थित होते.
निवडीनंतर बोलताना शिवराज काळभोर म्हणाले, “पक्षाने विश्वास दाखवत ३ वर्षाच्या उत्कृष्ट कमांची दखल घेत प्रहार विद्यार्थी संघटना पुणे जिल्हा अध्यक्ष या पदावर निवड केल्याने आणखी जोमाने काम करण्यास तयार आहे. यापुढील काळातही राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री बच्चु कडु यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी तत्पर आहे.”