Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

देशातील कापूस उत्पादनात ८ टक्के घट; ‘कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया’चा अहवाल काय म्हणतो पहा

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Monday, 25 December 2023, 15:50

अमरावती : कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाने (सीएआय) देशातील कापूस उत्पादन यंदा ८ टक्क्यांनी घटणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. २९५ लाख गाठींपर्यंत उत्पादन घसरणार आहे. कापसाचा वापर यंदाही कमी राहणार असला, तरी कापूस आयात जवळपास दुप्पट होऊन २२ लाख गाठींवर पोहोचेल, असे ‘सीएआय’च्या हंगामातील दुसऱ्या अहवालात म्हटले आहे.

मागील हंगामात देशात १२ लाख ५० हजार गाठी कापूस आयात झाला होता. हीच आयात यंदा २२ लाख गाठींवर पोहोचणार आहे. म्हणजेच आयातीत तब्बल ७६ टक्क्यांची वाढ होणार आहे. यापुढील काळात कापूस उत्पादनाविषयीचे चित्र स्पष्ट होईल. ‘सीएआय’ने आपल्या अंदाजात यंदा १४ लाख गाठी कापूस निर्यात होईल असे म्हटले आहे. मागील हंगामात देशातून १५ लाख ५० हजार गाठी कापूस निर्यात झाली होती. ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या कापसाच्या नव्या हंगामात २९५ लाख कापूस उत्पादनाचा अंदाज ‘सीएआय’ने व्यक्त केला आहे. एक कापूस गाठ १७० किलो रुईची असते.

मागील हंगामातील शिल्लक साठा जवळपास २९ लाख गाठींचा आहे. यंदा आयात ७६ टक्क्यांनी वाढून २२ लाख टनांची होईल. म्हणजेच यंदा एकूण कापूसपुरवठा ३४६ लाख गाठींचा असेल, असे ‘सीएआय’ने म्हटले आहे. देशातील कापूस वापर गेल्या वर्षी इतकाच म्हणजेच ३११ लाख गाठींचा होईल. कापूस निर्यात १४ लाख गाठींवर स्थिरावेल. मागील हंगामातील कापूस निर्यात १५ लाख ५० हजार गाठींची झाली होती.

 

सीएआयच्या अहवालानुसार, महाराष्ट्रात २०२३-२४ या हंगामात ७५.१४ लाख कापूस गाठींचे उत्पादन होण्याचा अंदाज आहे. २०२२-२३ च्या हंगामात महाराष्ट्रात ७९.२५ लाख गाठींचे उत्पादन नोंदवण्यात आले आहे. मध्य भारतातील गुजरात, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात १७५.६५ लाख गाठींचे उत्पादन होण्याची शक्यता आहे. या तीन राज्यांत गेल्या हंगामात १९०.६७ लाख गाठींचे उत्पादन झाले होते. खराब हवामानामुळे या राज्यांत कपाशीच्या पिकावर परिणाम झाला आहे. उत्तर भारतातील पंजाब, हरियाणा आणि राजस्थानमध्ये ४०.६६ लाख गाठी, दक्षिण भारतातील तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तमिळनाडूमध्ये ६५.४० लाख गाठींचे उत्पादन होण्याचा अंदाज आहे.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

न्हावरेतील ‘तो’ लाडावलेला डॉक्टर कोण? गर्भलिंग निदान रॅकेटच्या तपासात नव्या चर्चांना उधाण…..

Saturday, 4 July 2026, 9:48

मान्सूनचा रौद्रावतार! बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रात पावसाचा कहर वाढणार

Saturday, 4 July 2026, 9:44

पुणे हादरले! सहकाऱ्याची जीवघेणी ‘मस्करी’; कॉम्प्रेसरचा हाय-प्रेशर पाइप गुदद्वारात घातल्याने कामगाराचा मृत्यू

Saturday, 4 July 2026, 8:40

आंबेनळी घाट ‘या’ तारखेपर्यंत सर्व वाहनांसाठी बंद; मुसळधार पावसामुळे प्रशासनाचा मोठा निर्णय

Saturday, 4 July 2026, 8:19

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडली, उपचारासाठी रुग्णालयात केले दाखल; नेमकं काय झालं? वाचा

Saturday, 4 July 2026, 8:07

महाराष्ट्रात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा तडाखा; IMD चा रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी

Saturday, 4 July 2026, 7:37
Next Post

भाजपला पवार परवडणारे नाहीत... टप्प्याटप्प्याने ताकद कमी करणार; रोहित पवारांचा पलटवार...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.