पुणे : पुण्यात महाराष्ट्र प्रीमियर लीगचा थरार रंगला आहे. महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या वतीने आयोजित अदानी महाराष्ट्र प्रीमियर लीग (एमपीएल) 2025 स्पर्धेत सहाव्या दिवशी ईगल नाशिक टायटन्सने बाजी मारली आहे. ईगल नाशिक टायटन्स संघाने पीबीजी कोल्हापूर टस्कर्स संघाचा ४ गडी राखून पराभव करत या हंगामात सलग तिसरा विजय मिळवला आहे.

गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या मैदानावर ईगल नाशिक टायटन्सने नाणेफेक जिंकून प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी पीबीजी कोल्हापूर टस्कर्स संघ मैदानावर आला आणि प्रथम फलंदाजी करताना संघाने २० षटकात ९ बाद १३४ धावा केल्या. या डावात नाशिक टायटन्सकडून प्रशांत सोळंकी हा हिरो ठरला. त्याने १३ धावात ४ विकेट घेत पीबीजी कोल्हापूर टस्कर्सचे कंबरडे मोडले.

दुसऱ्या डावात ईगल नाशिक टायटन्स मैदानात उतरली, व कोल्हापूर टस्कर्सच्या १३४ धावांचे लक्ष सहज पार करत सामना आपल्या बाजूने वळवला. नाशिक टायटन्सने चार गडी राखत १३८ धावा करून सामना जिंकला.








