लोणी काळभोर (पुणे) : येथील रामा कृषी रसायन कंपनीत खत तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या स्पेंट अॅसिडचे संपर्क पाण्याशी आल्याने, रामा कृषी कंपनीच्या परिसरात पिवळसर नारंगी रंगाचे ढग तयार झाल्याने नागरीकात एकच खळबळ उडाली. मात्र कंपणी व्यवस्थापणाने कंपणीच्या आसपास तयार झालेल्या पिवळसर नारंगी रंगाच्या ढगामुळे मानवी जीवनाला कोणत्याही प्रकारचा धोका होणार नाही असे स्पष्ट केल्याने , नागरीकांच्यात तयार झालेले भितीचे वातावरण निवळले.
लोणी काळभोर हद्दीत पुणे -सोलापूर महामार्गाशेजारी रामा कृषी रसायन कंपनी ही खत निर्माण करणारी कंपणी आहे. यात कंपणीत खत तयार करण्यासाठी परराज्यातुन स्पेंट अॅसिड मागवले जाते. आज (गुरुवारी) सायंकाळी पाच वाजनेच्या सुमारास स्पेंट अॅसिड ची वाहतुक करणारे कांही टॅंकर, अॅसीड खाली करुन रस्त्याच्या कडेला थांबले होते. यावेळी कांही टॅंकर चालकांनी टॅकरमध्ये पाणी पाणी टाकुन, टॅंकर स्वच्छ करण्याचा प्रयत्न केला. यावेळी अॅसीड व पाणी यांचा संपर्क होताच, रस्त्याच्या आजुबाजुला पिवळसर नारंगी रंगाचे ढग तयार झाले होते. यामुळे लोणी काळभोरसह परिसरात एकच खळबळ उडाली. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.
याबाबत कंपनीतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले कि, ऍसिड मध्ये पाणी मिसळल्याने वरील ढग तयार झाले आहेत. आणि याचा मानवी जीवनाला कोणत्याही प्रकारचा धोका होणार नाही असे स्पष्ट सांगितल्याने परिसरातील नागरिकांनी सुटकेचा मोकळा श्वास सोडला. खते तयार करण्यासाठी रासायनिक स्पेंट वापरले जाते. स्पेंड थोडेसे शिल्लक राहिल्याने त्यामध्ये पाणी ओतण्यात आले. त्यामुळे वरील प्रकारचे पिवळसर नारंगी रंगाची ढग तयार झाले होते. परंतु, ते मानवी आरोग्यासाठी धोकादायक नसल्याचे कंपनीने स्पष्ट केले.