पुणे : केरळमध्ये आज मंकीपॉक्सचा दुसरा रुग्ण आढळल्यानंतर केंद्र सरकार पूर्णपणे सतर्क झाले आहे. केंद्राने विमानतळ-बंदरांवर कडक तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत, जेणेकरून मंकीपॉक्सचे रुग्ण वेळेत ओळखता येतील आणि त्यांच्यावर उपचार करता येतील.
जगातील २७ देशांमध्ये मंकीपॉक्सचे रुग्ण आढळून आले आहेत. भारतात आतापर्यंत मंकीपॉक्सचे दोन रुग्ण आढळून आले आहेत.
देशात मंकीपॉक्सचे दोन रुग्ण केरळमधील आहेत. दुसऱ्या प्रकरणाबाबत केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी सांगितले की, 31 वर्षीय तरुण गेल्या आठवड्यात दुबईहून केरळला आला होता. आजाराची लक्षणे दिसल्यानंतर त्याची तपासणी केली असता मंकीपॉक्स पॉझिटिव्ह आढळून आला. कन्नूरचा रहिवासी असलेल्या तरुणावर परियाराम वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. एक उच्चस्तरीय पथक केरळला पाठवण्यात आले आहे.
दरम्यान केरळमध्ये मंकीपॉक्सचे दोन रुग्ण आढळल्यानंतर राज्याच्या आरोग्य विभागाने रविवारपासून राज्यातील पाचही विमानतळांवर पाळत वाढवली आहे. परदेशातून येणाऱ्या लोकांची तपासणी केली जात आहे. देशात मंकीपॉक्सची पहिली केस केरळमधील होती.