राहुलकुमार अवचट
Bhimathadi sahitya sammelan यवत : अखिल भारतीय मराठी साहित्य संशोधन परिषदेच्या वतीने केडगाव चौफुला ( ता.दौंड ) येथे होणा-या दुसऱ्या राज्यस्तरीय भीमथडी मराठी संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध साहित्यिक डॉ.जयप्रकाश घुमटकर यांची निवड करण्यात आली आहे. या परिषदेच्या स्वागताध्यक्ष पदी भाऊसाहेब फडके यांची तर निमंत्रक पदी वसंतराव साळुंखे यांची निवड करण्यात आली आहे. (Dr. Jaiprakash Ghumtkar elected as President of Bhimathadi Marathi sahitya sammelan)
केडगाव चौफुला दि २७ व २८ मे २०२३ रोजी होणार भीमथडी मराठी साहित्य संमेलन
दूसरे राज्यस्तरीय भीमथडी मराठी साहित्य संमेलन दि २७ व २८ मे २०२३ रोजी होणार आहे. (Bhimathadi sahitya sammelan )या साहित्य संमेलनात ग्रंथदिंडी, जलाभिषेक, उद्घाटन समारंभ, पुरस्कार वितरण, कथाकथन, नाट्यप्रयोग, परिसंवाद, कविसंमेलन व समारोप असे कार्यक्रम होणार आहे.
या संमेलनाच्या संयोजन बैठकीला परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष व ज्येष्ठ साहित्यिक दशरथ यादव, राजाभाऊ जगताप, डॉ.भालचंद्र सुपेकर, संमेलनाचे मुख्य संयोजक संजय सोनवणे, दीपक पवार, रवींद्र खोरकर, सुशांत जगताप, बाळासाहेब मुळीक, अरविंद जगताप, रामभाऊ नातू उपस्थित होते. (Bhimathadi sahitya sammelan )
डॉ.घुमटकर हे ठाणे जिल्हा आणि शहर परिसरात साहित्य, संस्कृती व सामाजिक कार्यात गेली चाळीस वर्षे सक्रीय सहभागी आहेत. (Bhimathadi sahitya sammelan ) जव्हार येथे झालेल्या २५ व्या अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भुषविले आहे.
चित्रपट कसा काढावा? तऱ्हेवाईक नातेवाईक, विचित्र विश्व, विद्रोही जोतिबा, गोलघुमट-कोळीवाडा ते नौपाडा-एक प्रवास, साहित्य संमेलनाध्यक्ष निवडणूक- लेखाजोखा असे अनेक विविध विषय त्यांनी आपल्या लेखणीद्वारे परखडपणे हाताळले आहे.
यापूर्वी त्यांनी लिहिलेल्या युगपुरुष डॉ.बाबासाहेब आंबेडकर शोध आणि बोध या प्रबंधाला तर राष्ट्रीय पातळीवरचा दिल्लीचा सर्वोच्च दलित साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे. (Bhimathadi sahitya sammelan ) बुध्दधम्माच्या वाटेवर या पुस्तकाने तर साहित्य वर्तुळात प्रचंड खळबळ उडवून दिली होती. (Bhimathadi sahitya sammelan ) या पुस्तकालाही त्यांना दिल्लीचा सर्वोच्च दलित साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. काव्यक्षेत्रात गोलघुमट या टोपणनावाने ते कविता लेखन करतात. पानगळीची सळसळ, टवाळकी, खिल्ली, पोपटपंची आणि प्रेमासाठी वाट्टेल ते हे काव्यसंग्रह प्रकाशित झाले आहेत.
भाऊसाहेब फडके हे सामाजिक व राजकीय क्षेत्रात गेली वीस वर्षे काम करीत आहेत. (Bhimathadi sahitya sammelan) दौंड तालुका युवक वर्गात त्यांच्या विषयी आकर्षण आहे. गोरगरीब लोकांना त्यांची नेहमी मदत असते. कानगाव येथील आदर्श विद्यालय शालेय व्यवस्थापन समिती चे उपाध्यक्ष पद व शिवसेना तालुक्याचे सदस्य पद भूषवत आहे. (Bhimathadi sahitya sammelan ) मुलाना शालेय साहित्य वाटप,धार्मिक कार्याची आवड, गोर-गरीबाना मदत अशा कार्यानी कमी वेळात आपली छबी फडके यांनी निर्माण केली आहे. अनेक सामाजिक उपक्रमानी फडके हे नेहमी तालुक्यात अग्रगण्य स्थानावर राहीले आहे.
वसंतराव साळुंखे हे समाजिक व राजकीय कामात नेहमी अग्रेसर असतात. (Bhimathadi sahitya sammelan )साळुंखे हे सध्या शिवसंग्राम पुणे जिल्हाध्यक्ष पद भूषवत आहे.पाटस टोल प्लाझा हटाव संघर्ष समिती मार्फत त्यांनी अनेक प्रवाशांची व वाहतूकदारांची समस्या दूर केली आहे. वृक्षारोपण, समाजिक कार्यकर्ता म्हणून वसंतराव साळुंखे हे सर्वश्रुत आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Yavat News : कचरामुक्त गाव अभियान अंतर्गत यवत येथे श्रमदान, घनकचरा प्रकल्पासाठी जागेची पाहणी