अजित जगताप
वडूज : वंचित बहुजन आघाडी वडूज शहर तर्फे महात्मा ज्योतिबा फुले व डॅा. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त मुस्लिम बांधवांना पवित्र रमजान महिन्यात इफ्तार पार्टी चे नियोजन केले. यावेळी जय भिम,, जय मिम चा नारा देण्यात आला. दलित- मुस्लिम समाजाची नाळ कधी तुटू शकत नाही असे मुस्लिम युवा नेते इम्रान बागवान व वंचित बहुजन आघाडी युवा नेते तुषार बैले यांनी केले. तसेच एकमेकांना मिठाई चारून भाई चारा दाखवून दिला.
इफ्तार पार्टीत जय भिम, जय मिम चा बुलंद नारा…
सध्या देशात जातीयवादी पक्ष महागाई, बेरोजगारी बद्दल ‘ब्र ‘शब्द काढत नाही. याउलट सत्ताधारी पक्ष धर्म पुढे आणत आहेत. आज हिंदू बांधव सुद्धा महागाई ने त्रस्त आहेत. ह्या देशाला डॅा.बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानावर चालवायचं प्रामाणिक काम हे पूर्वीपासून राष्ट्रीय कॅाग्रेस पक्षानेच केले आहे. आज देशात संविधानाचा विचार होत नाही. ह्या देशातून संविधान संपवण्याचे काम सत्ताधारी पक्षाचे चालू आहे. त्याला छेद देण्याचे काम मुस्लिम व दलित बांधव करू शकतात.
डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती निमित्त रमजान रोजा इफ्तार पार्टीचे वंचित बहुजन समाजातील बांधवांनी केले आहे. ही चांगली बाब आहे. असे प्रेम कायमस्वरूपी राहू दया. ही भावना या वेळीइम्रान बागवान यांनी व्यक्त केली.
यावेळी वडूजचे माजी नगराध्क्ष डॉ महेश गुरव, वंचित बहुजन आघाडी जिल्हा संघटक इम्तियाज नदाफ, जेष्ठ नेते अशोक बैले, नगरसेवक तुषार बैले, आदी मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Vaduj News : भाजप सावरकर गौरव यात्रेला वडूज हुतात्मा नगरीत उदंड प्रतिसाद….!
Vaduj News : कामाचे बिल न मिळाल्याने अपंग ठेकेदाराने केले विष प्राशन ; वडूज येथील घटना…!