नवी दिल्ली : सध्या बहुतांश जणांकडे मोबाईल हा पाहिला मिळतोच. आता हा मोबाईल गरजेचाही झाला आहे. मोबाईल फोनच्या जास्त वापराने त्याचा बॅटरीवर परिणाम होतो. त्यामुळे वापर वाढल्यास बॅटरीची क्षमताही कमी होते. मात्र, अशा काही ट्रिक्स आहेत त्याचा वापर केल्यास मोबाईल बॅटरी लवकर डाऊन होणार नाही.
जर तुम्ही तुमच्या फोनचे ब्लूटूथ, वाय-फाय, आणि सेल्युलर डेटा यांसारख्या सेवा सतत सुरु ठेवल्या तर याचा परिणाम तुमच्या बॅटरी बॅकअपवर होऊ शकतो. तुमच्या फोनची बॅटरी लवकर संपत असल्यास तुम्ही बॅटरी सेव्हर मोड चालू करा. तुमचा स्मार्टफोन बॅटरी-सेव्हर किंवा पॉवर-सेव्हिंग मोडसह येतो. हे एकदा सुरु ठेवल्यास त्याचा बॅटरीच्या क्षमतेवर चांगला परिणाम दिसून येतो.
तसेच तुमच्या फोनची बॅटरी लेव्हल 20-60% च्या दरम्यान ठेवल्यास चांगला बॅटरी बॅकअप मिळू शकतो. तुमची बॅटरी 20% पर्यंत पोहोचल्यावरच तुम्ही तुमचा फोन चार्जिंगला लावावा. असे केल्यास बॅटरीचे संभाव्य नुकसान टाळता येऊ शकते. याशिवाय, फोनच्या हाय स्क्रीन ब्राईटनेसमुळे बॅटरी लवकर संपते. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या फोनचा ब्राईटनेस कमी करून तुमच्या फोनची बॅटरी वाचवू शकता.