सध्या थंडीचे दिवस सुरु आहेत. हिवाळ्यात लोक थंडीपासून बचाव करण्यासाठी लोकरी आणि उबदार कपडे घालतात. अनेकवेळा थंडीमुळे स्वेटर, टोपी किंवा मोजे घालून अनेकजण झोपतात. काही लोकांना ते खूप आरामदायक वाटते कारण ते थंडीपासून शरीराचे संरक्षण करते. पण, तुमचं हे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.
लोकरीचे कपडे जाड आणि उबदार असतात. हे परिधान करून झोपल्याने आराम मिळत नाही आणि झोपेचा त्रास होऊ शकतो. याशिवाय इतरही अनेक कारणे आहेत. लोकरमध्ये चांगले थर्मल इन्सुलेशन आहे, जे उबदारपणा प्रदान करते. ते त्याच्या तंतूंमध्ये हवा जाऊ देत नाही. त्यामुळे शरीरात निर्माण होणारी उष्णता बाहेर पडत नाही आणि थंडीही जाणवत नाही. पण तेच लोकरीचे कपडे घालून झोपल्याने शरीरात अतिरिक्त उष्णता निर्माण होऊ शकते. यामुळे घाम येऊ शकतो, ज्यामुळे निद्रानाश आणि त्वचा संक्रमण होऊ शकते.
लोकरीचे कपडे घालून झोपल्याने अनेक दुष्परिणाम होतात. यामुळे जास्त गरम होऊ शकते आणि घाम येणे त्वचेवर पुरळ उठणे, खाज सुटणे आणि ऍलर्जी होऊ शकते. विशेषत: ज्यांना आधीच त्वचेची ऍलर्जी आहे त्यांनी ते नक्कीच टाळावे. यांसारख्या अनेक समस्या उद्भवू शकतात.