Pune : सध्या सगळीकडे पावसाचे वातावरण सुरु आहे. या पावसामुळे घरात असताना सगळ्यात जास्त प्रश्न येतो तो म्हणजे कपडे न वाळण्याचा. उन्हाळ्यात अशी समस्या कधीच येत नाही. पण पावसाळा म्हटलं की हमखास या अडचणी समोर येतात. त्यात याच न वाळलेल्या कपड्यांमधून दुर्गंधी येण्याचेही आपण अनुभवले असेल. पण अशा काही गोष्टी आहेत त्या फॉलो केल्यास नक्कीच फायद्याचे ठरू शकते.
पावसाळ्याच्या दिवसात साठवलेल्या ओल्या कपड्यांमधून लवकरच दुर्गंधी येऊ लागते. अशा स्थितीत शेडमधील दोरीवर तुमचे कपडे वेगळे पसरवा, वातावरणात आर्द्रता असली तरी तुमच्या कपड्यांना वास येणार नाही. जेव्हा तुम्ही कपडे वेगवेगळे दोरीवर पसरवाल, त्यामुळे प्रत्येक कपडा नीट सुकला देखील जाईल आणि कपड्यांना वास देखील येणार नाही. याशिवाय, बेकिंग सोडा आणि व्हिनेगरचा वापर फायद्याचा ठरू शकतो.
पावसाळ्यात अनेकवेळा डिटर्जंटने कपडे धुतल्यानंतरही कपड्यांतून दुर्गंधी जात नाही. अशावेळी कपडे धुण्यासाठी डिटर्जंटमध्ये थोडे पांढरे व्हिनेगर किंवा बेकिंग सोडा पाण्यात मिसळा. असे केल्याने तुमच्या कपड्यांमधून येणारा वास निघून जाईल. तसेच कपड्यांमध्ये चांगली चमकही राहील.
पावसाळ्यात कपड्यांमधून दुर्गंधी येत असेल तर त्यावर लिंबाचा रस प्रभावी ठरू शकतो. पावसाळ्यात आर्द्रतेमुळे ओल्या कपड्यांमधून वास येऊ लागतो. अशा परिस्थितीत कपडे धुताना लिंबाचा रस पाण्यामध्ये टाकल्यास कपड्याचा घाण वास निघून जाईल. यासाठी एक वाटी लिंबाचा रस कपडे धुवायच्या पाण्यात टाका. कपड्यांना येणारा वास लगेच निघून जाईल. या अशा गोष्टींकडे लक्ष दिल्यास तुम्हाला फायदा नक्की होईल.