मुंबई : राज्यात महायुती सरकारच्या मोठ्या विजयानंतर मंत्रिमंडळ विस्तार पार पडले, त्यानंतर आता आठ दिवसांनी मंत्र्यांचे खातेवाटपही करण्यात आले. मंत्रिमंडळ खातेवाटपानंतर आता मंत्र्यांना मंत्रालयातील दालनाचे आणि दालनाच्या पाठोपाठ सरकारी बंगल्यांचेही वाटप करण्यात आले आहे.
त्यामध्ये विधानपरिषद सभापती राम शिंदे यांना ज्ञानेश्वरी, तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना शिवगिरी बंगला मिळाला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना रामटेक बंगल्याची चावी देण्यात आली आहे. महायुतीच्या 31 मंत्र्यांना बंगल्याचं वाटप करण्यात आलं असून त्याची यादीही समोर आली आहे. चला तर आपण जाणून घेऊयात कोणत्या मंत्र्यांना कोणता बंगला…
कोणत्या मंत्र्यांस कोणता बंगला
राम शिंदे सभापती विधान परिषद – ज्ञानेश्वरी
राहुल नावेकर, अध्यक्ष विधानसभा – शिवगिरी
चंद्रशेखर बावनकुळे – रामटेक
राधाकृष्ण विखे-पाटील – रॉयलस्टोन
हसन मुश्रीफ – (क-८) विशाळगड
चंद्रकांतदादा पाटील – ब-१ सिहगड
गिरीश महाजन – सेवासदन
गुलाबराव पाटील – जेतवन
गणेश नाईक – ब-४ पावनगड
दादा भुसे – ब-३ जंजीरा
संजय राठोड – शिवनेरी
धनंजय मुंडे – सातपुडा
मंगलप्रभात लोढा – ब-५ विजयदुर्ग
उदय सामंत – मुक्तागिरी
जयकुमार रावल – चित्रकूट
पंकजा मुंडे – पर्णकुटी
अतुल सावे – अ-३ शिवगढ़
अशोक उईके – अ-९ लोहगड
शंभूराजे देसाई – मेघदूत
आशिष शेलार – व-२ रत्नसिषु
दत्तात्रय भरणे – ब-६ सिध्दगड
अदिती तटकरे – अ-५ प्रतापगड
शिवेंद्रराजे भोसले – ३-७ पन्हाळगड
माणिकराव कोकाटे – अंबर-२७
जयकुमार गोरे क-६ – प्रचितीगड
नरहरि झिरवाळ – सुरुचि ०९
संजय सावकारे – अंबर-३२
संजय शिरसाठ – अंबर-३८
प्रताप सरनाईक – अर्वती-५
भरत गोगावले – सुरुचि ०२
मकरंद पाटील – सुरुचि-०३