Pune news : गोरख कामठे / हडपसर (पुणे) : पालकांमध्ये अपघातमुक्त शहराची संकल्पना विकसित करण्यासाठी फुरसुंगी (ता. हवेली) येथील लिटिल फ्लॉवर इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये ३०० हेल्मेटचे वाटप करण्यात आले. रिच संस्था, रोटरी क्लब ऑफ़ होरायझन आणि सेवा सहयोग संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने या हेल्मेटचे वाटप करण्यात आले.
लिटिल फ्लॉवर इंग्लिश मीडियम स्कूल येथील विद्यार्थी व पालक दुचाकीवर शाळेत ये-जा करतात. अशा विद्यार्थी व पालकांसाठी लिटिल फ्लॉवर इंग्लिश मीडियम स्कूलचे संस्थापक अध्यक्ष संजय हरपळे व संस्थेच्या संस्थापक सचिव सुधा हरपळे यांच्या मार्गदर्शनाखाली ३०० हेल्मेटचे वाटप करण्यात आले.
रिच संस्था, रोटरी क्लब आणि सेवा सहयोग संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने २५ शाळांमध्ये हेल्मेट वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त व्यंकटेश देशपांडे, वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक उल्हास कदम, डॉक्टर सुनील मालुसरे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी लिटिल फ्लॉवर इंग्लिश मीडियम स्कूलचे संस्थापक अध्यक्ष संजय हरपळे यांच्याकडून सर्व प्रमुख पाहुण्यांचे सत्कार व सन्मान करण्यात आला. रोटरी क्लब पुणे फुरसुंगीचे किरण पवार, अभिजीत खराडे, प्रदीप हरपळे, संतोष हरपळे, किशोर इनामके, संतोष माने तसेच रिच ट्रस्टचे पवन भारगाव, नितीन पाटील, शब्बीर पुनावाला, निलिमा पाटील, जितेंद्र मोहन, प्रिती गायकवाड, सेवा सहयोग संस्थेकडून मकरंद सातभाई, ऋषिकेश डहाळे, रोहित झगडे, दिलीप काळे, याचबरोबर विद्यार्थी व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.