पुणे : खडकवासला धरणातून बुधवारी (ता. १३) सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास ५ हजार ५६४ क्युसेकने पाणी कमी केले जाणार आहे. मंगळवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास १३ हजार १४२ क्युसेक पाणी सोडले होते. अशी माहिती खडकवासला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विजय पाटील यांनी दिली.
खडकवासला धरण पूर्ण क्षमतेने म्हणजे १००% भरले असल्याने पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानूसार विसर्ग कमी किंवा जास्त करण्याची शक्यता आहे. नदीकाठच्या नागरिकांनी दक्षता घ्यावी असे आवाहन पाटील यांनी यावेळी केले आहे.