अक्षय टेमगिरे / रांजणगाव गणपती : शिरूर तालुक्यातील दहिवडी येथील ग्रामीण भागातील नावाजलेले आणि सर्वसामान्य व्यक्ती आपल्या व्यवसायाचा केंद्रबिंदु माणून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत आयुर्विमा, आणि आरोग्य विमा पोहचविण्याचे कार्य करणारे दिलीप विश्वनाथ सातकर यांची ऑगस्ट 2025 मध्ये दुबई येथे होणाऱ्या जागतिक विमा परिषदेसाठी निवड करण्यात आली आहे. सातकर यांना हा पुरस्कार सलग ९ वेळा प्राप्त झाला आहे.
सातकर यांनी पुणे जिल्ह्यातील अनेक गांवाना विमाग्राम, विमास्कुल, पुरस्कार मिळवुण देण्यात त्यांचे मोलाचे योगदान आहे. सातकर हे गेल्या १६ वर्षापासून जीवन विमा सल्लागार व म्युच्युअल फंड वितरक व आरोग्य विमा सल्लागार म्हणून कार्यरत असुन कोविड महामारीच्या दरम्यान त्यांनी अनेक कुटुंबांना विमा मृत्यू दावे प्राप्त करून दिलेले आहेत. आरोग्य विम्याच्या माध्यमातून अनेक कुटुंबांना कोविड क्लेम प्राप्त करून देऊन आधार दिलेला आहे.
त्यांचा प्रामाणिकपणा लोकांच्या हिताचा विचार आणि जिद्द या माध्यमातून ग्राहकांच्या जीवनातील उद्दिष्टे प्राप्त करून देण्यासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांची या पुरस्कारासाठीची निवडीची घोषणा शिरुर एल. आय. सी शाखेचे शाखाव्यवस्थापक कपिल मालवी, राजगुरुनगर शाखेच्या व्यवस्थापक, सौ. हिंगणे मॅडम, व साहेबराव शितोळे यांनी केली. सातकर यांच्यावरती त्यांचे विमा खातेदार व मित्रपरिवार, व सर्व क्षेत्रातील नागरिकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.