सागर घरत
करमाळा – पुणे आणि सोलापुर या दोन जिल्ह्याला जोडणाऱ्या डिकसळ येथील जुन्या ब्रिटिशकालीन रेल्वे पुला वरती अनेक दिवसांपासून खड्ड्यांचे साम्राज्य पसरलेले होते. मात्र आता बाधकाम विभाकडून पुलाच्या रस्ते दुरुस्ती व खड्डे बुजवण्याचे काम सुरु झाले आहे. पावसामुळे पाणी साचून राहिल्याने पुलावरील रस्त्याची दुरावस्था झाली. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता.
दरम्यान, कोंढार चिंचोलीचे माजी सरपंच व सामाजिक कार्यकर्ते देविदास साळुंके यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वेळोवेळी लेखी तक्रार करून त्याचा सतत पाठपुरावा केला. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पुलाच्या रस्ते दुरुस्ती व खड्डे बुजवण्याचे चांगल्या दर्जाचे काम युद्धपातळीवर सुरू झाले. याचे नागरिकात मधुन समाधान व्यक्त होत आहे. यामुळे नागरिकांचे पुलावरून प्रवास करताना गैरसोय होणार नाही.