पुणे : संतोष देशमुख हत्या प्रकरणाने राज्यात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात वाल्मिक कराड यांच्यावर आरोप होत असताना मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणीही विरोधी पक्षाकडून केली जात आहे. वाल्मिक कराड यांचे बाॅस, मित्र धनंजय मुंडेंचं आहेत ते मंत्रिमंडळात असताना कराड यांच्यावर योग्य कारवाई होणार नसल्याचे सूर बीडमधील मराठा मोर्चात सर्वपक्षीय नेत्यांनी आवळला होता. वाल्मिक कराड यांनी सरेंडर केले असले तरी विरोधी पक्षांकडून धनंजय मुंडे यांना लक्ष केले जात आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री मुंडेंच्या मदतीसाठी धावून आले आहेत.
क्रीडा मंत्री दत्तात्रेय भरणे यांनी माध्यमांशी बोलताना धनंयज मुंडेंची पाठराखन केली आहे. नेत्याचे मित्र, कार्यकर्ते असतात. मित्राने काय केले म्हणून वरच्या नेत्याचा हात असतो असे नाही. या प्रकरणी धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करणे चुकीचे आहे, असे दत्तात्रेय भरणे म्हणाले.
नेमकं काय म्हणाले मंत्री दत्तात्रय भरणे?
तपास सुरू आहे. वाल्मिकजी कराड हे शरण आले आहेत. जे दोषी असेल त्यावर 100 टक्के कारवाई केली जाईल. पंकजाताई आमच्या नेत्या आहेत, धनंजय मुंडे आमचे नेते आहेत, असे देखील भरणे म्हणाले.
मुश्रीफही मुंडेंच्या मदतीला आले धावून..
राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री हसन मुश्रीफ देखील धनंजय मुंडेंच्या मागे उभे राहिले आहेत. धनंजय मुंडेंच्या राजीनामाची मागणी विरोधकांनी केली असताना मुंडेंनी राजीनामा देण्याची आवश्यकता नसल्याचे मुश्रीफ यांनी म्हटले आहे. जो पर्यंत कोणी दोषी अडथळ नाही तोपर्यंत कोणी राजीनामा देण्याची आवश्यकता नसल्याचेही देखील मुश्रीफ यांनी सांगितले.