राहुलकुमार अवचट
यवत – यवत (ता. दौंड) येथील श्री महालक्ष्मी माता मंदिरात नवरात्रीच्या ७ व्या माळेनिमित्त भाविकभक्तांची दर्शनासाठी सकाळपासून लांबच्या लांब रांगा लावल्या होत्या.
मंदिरात देवीच्या दर्शनासाठी सकाळपासुनच भाविकांची वर्दळ चालू होती. दुपारी चित्रकला स्पर्धा असल्याने शंभरपेक्षा जास्त स्पर्धकांनी सहभाग घेतला तर रात्री चैत्रालीचा नाद करायचा नाय या लावणी कार्यक्रमासाठीही पुरुषांबरोबरच महिलांचीही उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती लावणी कार्यक्रमासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात उपस्थिती पाहून कलाकारांनी देखील समाधान व्यक्त केले
श्री महालक्ष्मी माता नवरात्र उत्सव मंडळ व मा.श्री सुरेश भाऊ शेळके मित्र मंडळाच्या वतीने कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले
चैत्रालीचा नाद करायचा नाय, या कार्यक्रमातील मनमोहक अदाकारीने उपस्थितांची मने जिंकली. नवरात्री निमित्त आज रात्री ०८ वा जादुगार शिवम यांचा कार्यक्रम होणार असल्याचे मंडळाच्या वतीने सांगण्यात आले