अमिन मुलाणी / सविंदणे : महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई व पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती यांच्या वतीने “आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार भुषण” पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पत्रकार युनूस तांबोळी यांना “आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार भुषण” पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. पत्रकार दिनाचे औचीत्य साधून राज्यातील प्रिंट, डिजीटल व चॅनेल वर काम करणाऱ्या पत्रकार व छायाचित्रकारांना सन्मानित करण्यात आले. सन्मानचिन्ह, शाल व पुष्पगुच्छ अशा या सन्मानाचे स्वरूप होते.
पत्रकार दिनानिमित्त आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमाचे उदघाटन राज्याचे उद्योगमंत्री उदयजी सावंत, मदत व पुर्नवसन मंत्री मकरंदजी पाटील, कामगार मंत्री आकाशजी फुंडकर, संघटक संजयजी भोकरे, प्रदेशाघ्यक्ष वसंत मुंडे यांनी केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवसेनेचे उपनेते इरफानभाई सय्यद होते. यावेळी आमदार अमित गोरखे, उद्योजक श्रीचंद आस्वानी, संजय कलाटे, वैभव विधाटे, ज्ञानेश्वर तापकिर, यशवंत भोसले, विश्वासराव आरोटे, सदानंद शेवाळे उपस्थित होते.
महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान पुरस्कारासाठी २०१३-२०१४ तसेच २०१४-२०१५ साठी तांबोळी यांना महाराष्ट्र शासनाने गौरविले आहे. तसेच मनसे कडून मराठी भाषा गौरव दिनानिमित्त गौरविण्यात आले आहे. शिरूर तालुका पदवीधर संघटनेकडून कर्पे पुरस्कारने सन्मानित करण्यात आले आहे. याशिवाय विविध संस्थाकडून युनूस तांबोळी याना गौरविण्यात आले आहे. त्यांच्या राजकिय, शेती, शिक्षण व सामाजीक समस्यांवरील विषयाच्या लिखानामुळे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ व पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती यांच्या वतीने ग. दि. माडगुळकर सभागृह निगडी येथे ‘आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार भुषण’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.