अजित जगताप
सातारा : पुणे जिल्ह्यातील दिलदार व्यक्तिमत्व व शिवाजीनगर मतदारसंघाचे माजी आमदार विनायक निम्हण यांचे काही दिवसापूर्वी निधन झाले. त्यांच्या पाठोपाठ त्यांच्या मातोश्रीचे निधन झाले. काल पुणे येथे व्यस्त दौऱ्यातूनही उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी आमदार निम्हण यांच्या झुंज बंगल्यात भेट देऊन त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले .
यावेळी निम्हण यांच्या पत्नी माजी नगरसेवक श्रीमती स्वाती निम्हण, मुलगा माजी नगरसेवक चंद्रशेखर तथा सनी निम्हण, कन्या माधुरी व गायत्री या दोन कन्या उपस्थित होत्या.
पिंपरी चिंचवडचे माजी नगरसेवक अमित गावडे व राहुल गावडे यांचे माजी आमदार विनायक निम्हण हे मामा होते. भाउबीजेच्या दिवशी घडलेल्या या दुःखद घटनेमुळे सर्वत्र शोककळा पसरली होती.
भाजपच्या वतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री चंद्रकांत पाटील, भाजप नेते जगदीश मुळीक, मुरलीधर मोहोळ व सातारा शिवसेना जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.