लहू चव्हाण
पाचगणी : पाचगणी सहकारी पतसंस्थेने सभासदांचा आर्थिक फायदा न पाहता, जर वर्षी झालेला नफा इतर बॅंकांत फिक्समध्ये ठेवला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या ठेवी बुडणार नाहीत असे प्रतिपादन संस्थेचे माजी अध्यक्ष विठ्ठल गोळे यांनी केले.
पाचगणी को. ऑपरेटीव्ह क्रेडिट सोसायटीची ८६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी (दि १८) रोजी नगरपालिका शाळा क्रमांक दोनमध्ये घेण्यात आली होती. त्यावेळी बोलताना गोळे यांनी वरील प्रतिपादन केले आहे. यावेळी संस्थेचे अध्यक्ष अशिष लाभशंकर दवे,उपाध्यक्ष किसन उंबरकर, संचालक विजयकुमार भिलारे, दिलिप बावळेकर, अमोल माने, चंद्रकांत बिरामणे, रविंद्र कळंबे, रविंद्र गोळे, जाहीद सय्यद, प्रशांत कात्रट आदी मान्यवर उपस्थित होते उपस्थिती होते.
यावेळी बोलताना अशिष दवे म्हणाले की, यंदाच्या आर्थिक वर्षात या पतसंस्थेस १२ लाख ७७ हजार ४६९ रुपयांचा निव्वळ नफा झाल्याचे सांगून या पतसंस्थेकडे यंदा १ कोटी ९७ लाख ८१ हजार ७८० रुपयाचे भाग भांडवल, ३ कोटी ४९ लाख ४८ हजार ९१३ रुपयाच्या ठेवी, संस्थेने ३ कोटी ८२ लाख ४० हजार ४५५ रुपयाचे कर्ज वाटप केले आहे.
विजयकुमार भिलारे म्हणाले, विठ्ठलशेठ हे संस्थेचे १९९५ सालापासुन संचालक म्हणून कामकाज करीत आहेत. तसेच सन १९९८ या सालात त्यांनी अध्यक्षपदाची सुत्रे हाती घेतली व संस्थेची घोडदौड प्रगतीच्या दिशेने चालू ठेवली. ते हुशार व अनुभवी असल्यामुळे संस्थेचा कारभार त्यांनी २४ वर्षे पाहिला. संस्था प्रगती पथावर आणण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे.
दरम्यान, जी.के.आंब्राळे, अजित मोरे,अनिल बोधे यांनी संस्थेच्या विस्ताराबाबत व स्वमालकीच्या जागेबाबत आपली मते मांडली. तर या सभेचे प्रास्ताविक व अहवाल वाचन संथेचे सचिव संजय कांबळे यांनी केले.